China ready to occupy Taiwan? PLA's video goes viral
तैवानवर कब्जा करण्यासाठी चीनने केली पूर्ण तयारी? PLA चा व्हिडीओ व्हायरल By बाळकृष्ण परब | Published: October 13, 2020 3:40 PM1 / 6शेजारील देशांच्या कुरापती काढण्याचा कार्यक्रम चीनने कायम ठेवला आहे. एकीकडे भारतासोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावाचे वातावरण असतानाच चीनने तैवानलाही पुन्हा एकदा हल्ला करण्याची धमकी दिली आहे. 2 / 6 चीनच्या सरकारी टीव्हीने चॅनेल असलेल्या सीसीटीव्हीने एक असा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये चीना सैनिक एका अज्ञात बेटावर कब्जा करण्याचा सराव करत आहेत. या दरम्यान खूप गोळीबारही होताना दिसत आहे. 3 / 6यापूर्वी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असलेल्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने देखील लवकरच तैवानवर हल्ला केला जाईल, असे स्पष्ट शब्दांत सांगितले होते. दरम्यान, शनिवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये चिनी सैन्य म्हणजेच पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिका एका बेटावर कब्जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सराव करताना दिसत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे तैवान हा एका बेटावर वसलेला देश आहे.4 / 6गेल्या काही महिन्यांपासून चीन आणि तैवानमधील संबंध सातत्याने बिघडत आहेत. हल्लीच चीनने तैवानमधील एका व्यावसायिकाचा व्हिडीओ प्रसिद्ध करून त्याच्यावर हेरगिरीचा आरोप केला होता. तैवान हा आपलाच भाग आहे, असा चीनकडून दावा करण्यात येतो. तसेच चीन तैवान सरकारला सातत्याने बलप्रयोगाची धमकीही देत असतो. मात्र गेल्या सत्तर वर्षांपासून तैवान हे स्वयंशासित राज्य राहीले आहे. 5 / 6चिनी सैन्याने केलेल्या युद्ध सरावाच्या एका नव्या व्हिडीओमध्ये एक लढाऊ हॅलिकॉप्टर आणि जमिनीवरून डागण्यात येणारी क्षेपणास्त्रे दिसत आहेत. हा युद्धसराव चीनचा सीमावर्ती भाग असलेल्या फुजिआन आणि गुआंगडोंग येथे करण्यात आला आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार चिनी सैन्याच्या ७३ व्या ग्रुप आर्मीने या युद्धसरावात भाग घेतला होता. गरज पडेल तेव्हा हेच सैनिक तैवानवर हल्ला करतील, असे सांगण्यात येत आहे. 6 / 6दरम्यान, शनिवारी तैवानच्या राष्ट्रपती त्साई इंग वेंग यांनी सांगितले की, चीनने तैवानच्या म्हणण्याकडे लक्ष दिले चीनसोबतचा तणाव कमी होईल, अशी मला अपेक्षा आहे. चीनने आपल्या भूमिकेत बदल करावा आणि तैवानसोबत पुन्हा चर्चा सुरू करावी. आणखी वाचा Subscribe to Notifications