china shanghai airport employee infected with corona more than 8000 people tasted
CoronaVirus News : बापरे! विमानतळावरील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, तब्बल 8000 जणांची केली चाचणी अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 10:42 AM1 / 13जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल पाच कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. 2 / 13अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. जगभरात कोरोनावर युद्धपातळीवर संशोधन सुरू असून चाचण्यांना यश येत आहे. 3 / 13चीनमधील विमानतळावरील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने जवळपास आठ हजार जणांची कोरोना चाचणी केली आहे. 4 / 13दिलासादायक बाब म्हणजे कर्मचाऱ्याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.5 / 13मिळालेल्या माहितीनुसार, चीनचे आर्थिक केंद्र असलेल्या शांघाईमधील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. 6 / 13कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर जवळपास 186 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. तर आठ हजारांहून अधिक जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. 7 / 13विमानतळावरील कर्मचाऱ्याशिवाय इतर कोणीही कोरोनाबाधित आढळलं नसल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. चीनमधील तियानजीन शहरात स्थानिक पातळीवर एक रुग्ण आढल्यानंतर 77 हजारांहून अधिक जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. 8 / 13राष्ट्रीय आरोग्य प्रशासनाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, परदेशातून चीनमध्ये आलेल्या 21 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर 426 जणांवर उपचार सुरू आहेत. 9 / 13चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 86,267 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 4,634 जणांचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 13चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत असल्याची माहिती समोर आली आहे. चीनमधील एका मोठ्या शहरामध्ये तब्बल 50 लाख नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत.11 / 13पुन्हा एकदा या संपूर्ण भागामध्ये लॉकडाऊन लागू करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. चीनच्या पश्चिमेकडील शिनजियांगजवळील काशगरमध्ये या चाचण्या करण्यात येणार आहे.12 / 13कोरोनाचा एक रुग्ण आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कोरोना चाचण्यांना सुरुवात करण्यात आल्यापासून 137 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.13 / 13कोरोनाला रोखल्यानंतर आता पुन्हा शिनजियांगजवळच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. म्हणूनच नागरिकांची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications