शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीनवर दुहेरी संकट! इन्फ्लूएंझा आणि कोरोनाचा मोठा धोका, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 2:43 PM

1 / 10
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान चीनवर दुहेरी संकट आलं आहे. इन्फ्लूएंझा आणि कोरोनाचा मोठा धोका पाहायला मिळत असून तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे.
2 / 10
दक्षिण चीनमध्ये साथीचा आजाराच्या उद्रेकामुळे औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यानंतर डॉक्टरांनी इन्फ्लूएंझा (Influenza) आणि कोरोना (Corona) या दोन्ही आजाराबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. एक सरकारी रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
3 / 10
ग्लोबल टाइम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार तज्ज्ञांनी सांगितले की, सतत कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपायांमुळे कमकुवत झालेली सामूहिक प्रतिकारशक्ती ही इन्फ्लूएंझा आजार वाढण्यासाठी जबाबदार असू शकते.
4 / 10
इन्फ्लूएंझाग्रस्त लोकांची संख्या हिवाळ्याच्या तुलनेत खूप जास्त आहे. जेव्हा संक्रमण अधिक वेगाने पसरते तेव्हा अशी परिस्थिती उद्भवते. तज्ञांनी देखील चिंता व्यक्त केली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
5 / 10
ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, चायनीज नॅशनल इन्फ्लुएंझा सेंटर (CNIC) च्या नव्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, 4 एप्रिलपासून 19 जूनच्या दरम्यान 17 प्रांतांमध्ये इन्फ्लूएंझाचे 507 प्रकरण समोर आली आहे.
6 / 10
503 दक्षिण चीनमध्ये आहेत. 2021 च्या 136 प्रकरणांच्या तुलनेत आताची संख्या खूप जास्त आहे. फ्लूच्या बळींची संख्या 10 किंवा त्याहून अधिक पोहोचते तेव्हा इन्फ्लूएंझाचा उद्रेक झाला आहे, असं म्हटलं जातं.
7 / 10
'मोठ्या मागणीमुळे, दक्षिण चीनमधील अनेक फार्मसीमध्ये ओसेल्टामिवीर सारखी इन्फ्लूएंझासाठी अँटीव्हायरल औषधे कमी प्रमाणात उपलब्ध आहेत,' असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
8 / 10
सीएनआयसीच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, दक्षिणी चीनमधील ग्वांगडोंग (119) आणि गुआंग्शी ज़ुआंग (79) तसेच पूर्वी चीनमधील फ़ुज़ियान (109) प्रांत मोठ्या प्रमाणात इन्फ्लूएंझा आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळली आहे.
9 / 10
शेनझेन रुग्णालयाचे प्रमुख लू होंगझोउ यांनी ग्लोबल टाईम्ससोबत बोलताना सांगितले की, मुसळधार पाऊस, कमी तापमान आणि कोरोनाविरोधातील नियंत्रण उपायांमुळे लोकांमध्ये श्वसन रोगांचा धोका कमी झाला आहे.
10 / 10
रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, इन्फ्लूएंझा ए (H3N2) उपप्रकाराची सर्वाधिक प्रकरणे दक्षिण चीनमध्ये आढळून आली आहेत. याचा संक्रमण दर जास्त आहे. तर मृत्यू दर 0.2% इतका आहे, अशी माहितीही शेनझेन रुग्णालयाचे प्रमुख लू होंगझोउ यांनी दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन