शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

China Warns America: रशियानंतर आता चीनने अमेरिकेवर डोळे वटारले! तैवानशी सर्व संबंध तोडा, पॉलिसी लक्षात आहे ना...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 7:51 PM

1 / 8
China vs America: युक्रेन आणि रशिया यांच्या वादात पडणाऱ्या अमेरिकेला आधी रशियाने इशारा दिला होता. त्यानंतर आता तैवानसोबतच्या संबंधांबाबत चीननेही अमेरिकेला कडक शब्दात इशारा दिला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला तैवानशी असलेले सर्व अधिकृत संबंध त्वरित तोडावेत, असे सांगितले आहे.
2 / 8
चीनने पुन्हा एकदा तैवानला आपलाच भाग असल्याचा पुनर्उच्चार केला आहे. यामुळे आता अमेरिका आणि चीनमधील तैवानबाबतचा तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
3 / 8
रशिया-युक्रेन युद्धामुळे बिडेन प्रशासनाने आपले संपूर्ण लक्ष पूर्व युरोपवर केंद्रित केले होते. पण, आता अमेरिकेने पुन्हा एकदा आशियामध्ये लक्ष देण्यास सुरुवात केले आहे.
4 / 8
एक दिवस अगोदर, यूएस सिनेट फॉरेन रिलेशन कमिटीचे अध्यक्ष बॉब मेनेंडेझ यांच्या नेतृत्वाखाली सहा यूएस काँग्रेस सदस्यांचे शिष्टमंडळ तैवानमध्ये आले होते. ते तैवानचे राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन आणि राष्ट्रीय संरक्षण मंत्री चिऊ कुओ-चेंग यांच्याशीही चर्चा करणार आहेत.
5 / 8
ही भेट अनौपचारिक असू शकते, पण त्यामुळे चीन नाराज झाला आहे. खरं तर, तैवानला अमेरिकेने स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिलेली नाही, त्यामुळे अमेरिका आणि तैवान यांच्यात औपचारिक भेट होऊ शकत नाही.
6 / 8
तैवानची वृत्तसंस्था सीएनएने वृत्त दिले आहे की, या भेटीत अमेरिका-तैवान सहकार्य, चीनचा धोका आणि प्रादेशिक सुरक्षा यावर चर्चा होईल.
7 / 8
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियानने अमेरिकेला म्हटले की, त्यांनी तैवानशी अधिकृत देवाणघेवाण थांबवावी. अमेरिका आणि तैवान प्रदेश यांच्यातील कोणत्याही प्रकारच्या अधिकृत संवादाला चीनचा ठाम विरोध आहे.
8 / 8
देशाच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याच्या चीनच्या वचनबद्धतेलाही त्यांनी दुजोरा दिला आणि अमेरिकेला इशारा दिला. दरम्यान, तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितल्यानुसार, या भेटीमुळे यूएस काँग्रेसमध्ये तैवानला दोन्ही पक्षांचा पाठिंबा दिसून आला आहे.
टॅग्स :Americaअमेरिकाchinaचीन