शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

600 दिवसांपासून एकही परराष्ट्र दौरा नाही, फक्त फोनवरच चर्चा; एवढी खालावली चिनी राष्ट्रपती जिनपिंग यांची प्रकृती!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 9:20 AM

1 / 8
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भात अफवांचा बाजार जबरदस्त तापला आहे. माध्यमांतील वृत्तांमध्येही ना-ना प्रकारचे अनुमान लावत त्यांची प्रकृती खालावली असल्याचा दावा केला जात आहे. जिनपिंग यांची परराष्ट्र दौऱ्यांसंदर्भातील उदासीनतेमुळेही या अफवांना बळ मिळत आहे. एवढेच नाही, तर ते कदाचित प्रत्यक्ष बैठका अथवा भेटी घेण्याच्या स्थितही नसावेत, असे कयासही लावले जात आहेत. त्यांची प्रकृती खालवल्याच्या समर्थनार्थ काही युक्तिवादही केले जात आहेत. (China xi jinpings reluctance to head overseas leads to speculation on his health conditions)
2 / 8
600 दिवसांत एकही परराष्ट्र दौरा नाही - माध्यमांतील वृत्तांनुसार, राष्ट्रपती जिनपिंग यांनी 600 दिवसांत एकही परराष्ट्र दौरा केलेला नाही. यापूर्वी ते 18 जानेवारी, 2020 रोजी म्यानमार दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यानंतर इतर कुठल्याही देशात गेलेले नाही.
3 / 8
व्यैयक्तीक बैठका बंद - माध्यमांतील वृत्तांनुसार, सध्याच्या परिस्थिती पाहता, शी जिनपिंग हे कुठल्याही परदेशी नेत्यांची वैयक्तिकरित्या भेट घेताना दिसत नाहीत. याशिवाय, जे पराराष्ट्र नेते दौरे करत आहेत, त्यांत जिनपिंग यांच्या भेटीचा कार्यक्रम दिसत नाही. तसेच, एकादा परराष्ट्र मंत्री आलाच तरी तो बिजिंग शिवाय इतर शहरात जातो. यामुळे शी जिनपिंग यांची भेट अनिवार्य होत नाही.
4 / 8
दूरध्वनीवरच संभाषण - प्रकृती खालावल्याने आता राष्ट्रपती जिनपिंग हे दूरध्वनीवरूनच बोलत आहेत. उपरोक्त काळात त्यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, जर्मन चान्सलर अँजेला मर्केल आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह जवळपास 60 देशांच्या प्रमुख्यांसोबत त्यांनी दूरध्वनीवरूनच चर्चा केली.
5 / 8
बैठकांमध्येही व्हर्च्युअल सहभाग - या वर्षात, राष्ट्रपती जिनपिंग यांनी अनेक आंतरराष्ट्रीय बैठकांत सहभाग घेतला. या बैठकांत ते, व्हर्च्युअलीच उपस्थित होते. 9 सप्टेंबर 2021 रोजीही झालेल्या ब्रिक्स बैठकीतही ते व्हर्च्युअलीच उपस्थित होते. याशिवाय, ऑक्टोबर 2021 मध्येही रोममध्ये होणाऱ्या जी 20 शिखर परिषदेत जिनपिंग यांच्या व्यक्तीशः उपस्थितीसंदर्भात कुठलीही पुष्टी करण्यात आलेली नाही.
6 / 8
कुठलेही कारण न देता बैठका रद्द - राष्ट्रपती जिनपिंग यांनी कोणतेही कारण न देता चीनमधील अमेरिकेचे परराष्ट्र सचिव, सिंगापूरचे पंतप्रधान, डॅनिश पंतप्रधान यांच्यासोबतच्या बैठका स्थगित केल्या, असेही वृत्तांमध्ये म्हणण्यात आले आहे.
7 / 8
पायाच्या समस्येचे संकेत - माध्यमांतील वृत्तांमध्ये, मार्च 2019 मधील जिनपिंग यांच्या इटली, मोनाको आणि फ्रान्सच्या भेटीचा उल्लेख आहे. या दौऱ्यात गार्ड ऑफ ऑनर अंतर्गत निरिक्षण करताना चिनी राष्ट्रपती गडबडल्यासारखे दिसले. तसेच, फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रोन यांच्यासोबत चर्चेदरम्यान जिनपिंग खूर्चीचा आधार घेताना दिसले.
8 / 8
भाषणादरम्यान वारंवार खोकला - शेनझेन स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त, जिनपिंग नियोजित वेळेपेक्षा बऱ्याच वेळानंतर व्यासपीठावर भाषण देण्यासाठी पोहोचले. यावेळी दिलेल्या एक तासांच्या भाषणात ते अत्यंत हळुवार बोलत होते. एवढेच नाही, तर यादरम्यान त्यांना वारंवार खोकला येत होता आणि ते वारंवार पाणीही पीत होते.
टॅग्स :Xi Jinpingशी जिनपिंगchinaचीनHealthआरोग्य