मगरमिठी! निम्म्याहून अधिक जगावर चीनच्या कर्जाचा डोंगर; भारतात एवढा नंबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 13:00 IST
1 / 10लडाखच्या गलवान घाटीमध्ये भारतीय जवानांवर चीनच्या लष्कराने हल्ला केला. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले. तर चीनचे दुप्पट सैनिक मारले गेले. यामुळे दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव कमालीचा वाढला आहे. यामुळे संतप्त झालेले नागरिक चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत. यासाठी सोशल मिडीयावर कँम्पेन सुरु झाले आहे. 2 / 10चीनच्या विळख्यात सापडलेला भारतच एकटा देश नाहीय तर अमेरिकेसह जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये चीनच्या उत्पादनांनी आणि कर्जाद्वारे चीनने हातपाय पसरले आहेत. 3 / 10चीनने जवळपास 150 हून अधिक देशांमध्ये तब्बल 112.5 लाख कोटींची रक्कम गुंतवली आहे. चीनने एक खतरनाक खेळ जगासोबत खेळलेला आहे. यामध्ये आपल्यापेक्षा बलाढ्य किंवा सक्षम देशांना वादामध्ये गुंतवून ठेवणे आणि कमी ताकदीच्या शेजारी देशांना कर्जाच्या विळख्यात अडकविणे, ही निती अवलंबलेली आहे. 4 / 10दुर्बल देशांना जसे की, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार अशा देशांना कर्ज देऊन त्यांना आपल्या दबावात ठेवण्याचे धंदे चीनने केले आहेत. हे अशासाठी की अमेरिकेच्या तुलनेत चीनला जागतिक ताकद म्हटले जावे. 5 / 10धक्कादायक म्हणजे चीनने आजवर 150 हून अधिक देशांना कर्ज वाटले आहे. ही रक्कम जगाच्या जीडीपीच्या 5 टक्के आहे. चीन सरकार आणि सरकारची सहाय्यक कंपन्यांनी दुसऱ्या देशांना जवळपास 1.5 ट्रिलिअन डॉलर म्हणजेच 112.5 लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज दिले आहे. 6 / 10एवढेच नाही तर जगाला कर्ज पुरवठा करणारी जागतिक बँक आणि आयएमएफपेक्षाही जास्त कर्ज चीनने वाटले आहे. 2000 ते 2014 च्या काळात अमेरिकेने अन्य देशांना 394.6 अब्ज डॉलरचे कर्ज दिले आहे. तर चीनने 354.4 अब्ज डॉलरचे कर्ज वाटले आहे. नंतरच्या काळात अमेरिकेने हात आखडता घेतल्याने चीन पुढे निघून गेला आहे. 7 / 10जागतिक बँक आणि आयएमएफचे एकूण कर्जही चीनपेक्षा कमी आहे. चीनने जादातर पैसे हे इन्फ्रास्ट्रक्चर, एनर्जी आणि मायनिंगसारख्या क्षेत्रासाठी दिले आहेत. याद्वारे या पैशांतून चीन आपलाच फायदा करून घेत आहे. 8 / 102005 मध्ये दुबळ्या देशांना दिलेल्या कर्जाची रक्कम चीनच्या तेव्हाच्या जीडीपीच्या 1 टक्के होती. आता 2017 मध्ये ही रक्कम चीनच्या जीडीपीच्या 15 टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. 9 / 10भारतातही चीनचा अब्जावधींचा पैसा लागलेला आहे. 2014 पर्यंत चीनने भारतात 1.6 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. तीन वर्षांतील ही रक्कम 8 अब्ज डॉलरवर गेली आहे. 10 / 10चीनने भारतात केलेल्या भविष्यातील घोषणांचा आकडा जोडल्यास ही रक्कम 26 अब्ज डॉलरवर जात आहे. एवढेच नाही तर चीनचे अमेरिकेवरही कर्ज आहे. चीनपासून कर्ज घेतलेल्या देशांची यादी मोठी असताना वाद असलेल्या देशांची यादीही मोठी आहे. यामध्ये अमेरिकाही आहे.