China's plot to seize the global vaccine market is a dangerous conspiracy
जगभरातील व्हॅक्सिनच्या बाजारावर कब्जा करण्याचा चीनचा डाव, रचले असे धोकादायक कारस्थान By बाळकृष्ण परब | Published: October 04, 2020 11:02 PM1 / 6कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याचदरम्यान, जगभरातील व्हॅक्सिनच्या बाजारावर कब्जा करण्यासाठी चीनने धोकादायक कारस्थान आखल्याचे समोर आले आहे. 2 / 6आपल्या कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण केल्याशिवाय चीनने व्हॅक्सिनेशनच्या कार्यक्रमाचा विस्तार करण्याची तयारी सुरू केली आहे. आता देशामध्ये मोठ्या प्रमाणात व्हॅक्सिन देण्यात येतील. मात्र कुठलेही विश्वसनीय सकारात्मक परिणाम आणि घाईगडबडीमध्ये मोठ्या लोकसंख्येला लस देण्याचा निर्णय हा धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 3 / 6फायनान्शियल टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार चीनमधील लसनिर्मात्या कंपन्या धोकादायक मार्गावरून चालत जगभरातील व्हॅक्सिनच्या बाजारावर कब्जा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गेल्या महिन्यामध्ये चीनमधील लसनिर्माता कंपनी असलेल्या सिनोफार्मने लाखो चिनी नागरिकांना यापूर्वीच लस देण्यात आली असल्याची घोषणा करून जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता. 4 / 6 जुलैमध्ये चीनच्या सरकारने कोरोना विषाणूवरील लसीच्या मर्यादित वापराची परवानगी दिली होती. ज्याच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल अद्याप पूर्ण झालेले नाही. चीनमधील हेल्थ वर्कस, सरकारी कर्मचारी आणि हायरिस्क एरियामध्ये प्रवास करणाऱ्यांना सुरुवातीला कोरोनावरील लस देण्याता आल्याचे सांगण्यात येत आहे. 5 / 6 आता चीन आपल्या व्हॅक्सिनेशन प्रोग्रॅ्मचा विस्तार करत आहे आणि मोठ्या लोकसंख्येला लस देण्यासाठी तयारी करत आहे. मात्र तज्ज्ञांकडून ही रणनीती सर्वात धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तज्ज्ञांकडून ही बाब धोकादायक असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. मात्र लस जागतिक बाजारात लवकरात लवकर पोहोचवण्याच्या घाईमध्ये चीनकडून अशी पावले उचलली जात आहेत. 6 / 6एफटी.कॉमच्या वृत्तानुसार चीनच्या कमीत कमी एका राज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून अशा कंपन्या आणि सरकारी विभागांच्या कर्मचाऱ्यांची माहिती मागितली जात आहे. जे कोरोनावरील लस टोचून घेण्यासाठी इच्छुक आहेत. या व्यक्तींना हिवाळ्यापूर्वी लस दिली जाईल. आणखी वाचा Subscribe to Notifications