शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेला 'युद्ध' हवेच असेल, तर आम्हीही तयार! डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचं थेट आव्हान! काय म्हणाले होते ट्रम्प?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 14:21 IST

1 / 9
अमेरिेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणाने संपूर्ण जगातच खळबळ उडवून दिली आहे. मात्र आता बुधवारी चीनने अमेरिकेला प्रत्युत्तर देत थेट आव्हान दिले आहे.
2 / 9
जर अमेरिकेने व्यापार निर्बंधांच्या स्वरूपात युद्ध सुरू केले असेल तर आम्हीही त्याचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. जर अमेरिकेने व्यापार युद्ध सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर आम्ही हे युद्ध शेवटपर्यंत लढू, असे चीनने म्हटले आहे.
3 / 9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरीफ धोरणासंदर्भात चीनच्या अमेरिकेतील दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे की, 'जर अमेरिकेला युद्ध हवेच असेल, तर मग ते टॅरिफ युद्ध असो, व्यापार युद्ध असो अथवा इतर कुठल्याही स्वरुपाचे युद्ध असो, आम्ही ते युद्ध शेवटपर्यंत लढण्यास तयार आहोत.'
4 / 9
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलपासून भारत, चीन आणि इतर देशांवर कर लादण्याची घोषणा केल्यानंतर, चीनचे हे विधान आले आहे.
5 / 9
काय म्हणाले होते ट्रम्प? - ट्रम्प म्हटले होते, 'गेली अनेक दशके इतर देश आमच्याविरोधात टॅरिफचा वापर करत आहेत. आता आमची वेळ आहे. आम्ही याच टॅरिफचा वापर आता त्या देशांविरोधात करणार आहोत. जर आपण ट्रम्प प्रशासनांतर्गत अमेरिकेत तुमचे उत्पादन बनवत नसाल, तर तुम्हाला टॅरिफ द्यावा लागेल. यावेळी ट्रम्प यांनी पहिल्यांदाच अमेरिकेवर टॅरिफ लावणाऱ्या देशांची यादीही वाचून दाखवली.
6 / 9
ट्रम्प म्हणाले, युरोपीय संघ, चीन, ब्राझील, भारत, मॅक्सिको आणि कॅनडा हे देश आमच्यावर टॅरिफ लावतात, तुम्ही हे कधी ऐकलंय का.. याशिवाय असे बरेच देश आहेत जे आमच्याकडून अधिकचा टॅरिफ वसूल करतात. जो आपण लावत असलेल्या टेरिफ पेक्षाही अधिक आहे. हे अत्यंत चुकीचे आहे.
7 / 9
भारताचे नाव घेत ट्रम्प म्हणाले, भारत आपल्याकडून १०० टक्क्याहून अधिक ऑटो टॅरिफ वसूल करतो. याशिवाय, अमेरिकेच्या उत्पादनावर चीनकडून लावला जाणारा टॅरिफ आपल्यापेक्षाही दुप्पट आहे. दक्षिण कोरियाचे टॅरिफ चार पटीने अधिक आहे. आपण कधी याचा विचार केलाय का? असा प्रश्नही ट्रम्प यांनी यावेळी संसदेतील सदस्यांना केला.
8 / 9
चीनची प्रतिक्रिया - अमेरिकेच्या या धोरणावर प्रतिक्रिया देताना, आपण अमेरिकेच्या व्यापार धोरणांचा सामना करण्यासाठी तयार आहेत. तसेच, कुठल्याही प्रकारच्या आर्थिक संघर्षापासून मागे हटणार नाही आणि शेवटपर्यंत ही लढाई लढणार, असे चीनने म्हटले आहे.
9 / 9
महत्वाचे म्हणजे, यामुळे व्यापारात तणाव निर्माण होऊ शकतो. खरे तर, चीन आणि अमेरिका यांच्यात आधीपासूनच अनेक विषयांवर मतभेत आहेत.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पXi Jinpingशी जिनपिंगchinaचीनAmericaअमेरिकाIndiaभारत