शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Afghanistan Crisis: जैशचा कमांडर आणि चीनी राजदूताची तालिबानी नेत्यांसोबत बैठक; अफगाणिस्तानवरील कब्जाबाबत दिल्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 12:21 PM

1 / 9
अफगाणिस्तानातील चीनचे राजदूत वांग यू आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा चीफ कमांडर मुफ्ती अब्दुल रऊफ अजहर यानं कंधारमध्ये तालिबानी नेतृत्वाची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
2 / 9
चीनी राजदूत आणि जैशचा कमांडर यांनी वैयक्तिकरित्या वेगवेगळ्या वेळी तालिबानी नेत्यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे.
3 / 9
अफगाणिस्तानवर मिळवलेल्या नियंत्रणाबाबत तालिबानी नेत्यांचं कौतुक आणि शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
4 / 9
अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सत्ता येण्याची जोरदार तयारी सुरू असताना राष्ट्रपतीपदासाठी मुल्ला बरादर याचं नाव आघाडीवर आहे. मुल्ला बरादर सध्या कंधारमध्येच असल्याचं सांगितलं जात आहे.
5 / 9
तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मुलगा आणि संघटनेचा डेप्युटी लीटर मुल्ला याकूब देखील कंधारमध्ये आहे. चीनी राजदूत वांग यांनी बुधवारी अफगाणिस्तानातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरुन मुल्ला याकूबची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे.
6 / 9
या भेटीनंतर अफगाणिस्तानाच्या पुनर्निमाणासाठी चीनची शक्य ती सर्व मदत करण्याची तयारी असल्याचं चीनी राजदूतांनी तालिबान्यांना सांगितल्याचं बोललं जात आहे.
7 / 9
तालिबानशी जुळवून घेऊन बेल्ड अँड रोड योजनेला चालना देण्याचा चीनचा गेमप्लान आहे. याअंतर्गत गॅस आणि खनिज संसाधनांची पूर्तता करण्यासाठी अफगाणिस्तानच्या माध्यमातून चीन मध्य आशियाई देशांपर्यंत पोहोचण्याचा चीनचा मनसुबा आहे.
8 / 9
दुसरीकडे जैशचा कमांडरनं आपल्या दहशतवादी संघटनेची तालिबान्यांसोबतची निष्ठा व्यक्त करण्यासाठी तालिबानी नेतृत्वाची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. मुफ्ती रऊफचा मोठा भाऊ मौलाना मसूद अझहर १९९४ साली श्रीनगर परिसरात अटक करण्यात आली होती. त्याला सोडवण्यासाठी इंडियन एअलाइन्सच्या विमानाचं अपहरण करण्याचा प्रताप त्यावेळी करण्यात आला होता. प्रवाशांच्या सुखरूपतेसाठी मसूद अझहर याला सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यानंतर जैश-ए-मोहम्मद नावाच्या संघटनेची स्थापना दहशतवाद्यांनी केली होती.
9 / 9
विमानाचं अपहरण करण्याचं प्लानिंग त्यावेळी तालिबान्यांच्या मदतीनं करण्यात आलं होतं. पण यावेळी तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी होऊ देणार नाही असं विधान केलं आहे. असं असलं तरी तालिबानचे जैश आणि अल कायदा संघटनांसोबत घनिष्ट संबंध आहेत. त्यामुळे तालिबानच्या दाव्यांवर कितपत विश्वास ठेवायचा हा प्रश्नच आहे.
टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानchinaचीनPakistanपाकिस्तान