शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीन म्हणे, जवळ येत होतं अमेरिकेचं लढाऊ विमान, धमकावून पळवून लावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 2:22 PM

1 / 10
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाची उत्पत्ती चीनमधल्या वुहानमधून झाली असल्यानं अनेक देशांचा बीजिंगवर राग आहेत. त्यातच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, फ्रान्ससारख्या देशांनी चीनविरोधात आघाडी उघडली आहे.
2 / 10
. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भारतासाठीही चीन डोकेदुखी ठरत आहे. त्यातच अमेरिकेनं चीनविरोधात उघड उघड भूमिका घेण्यास सुरुवात केली असून, चीनला वेळोवेळी इशारा दिला आहे.
3 / 10
दक्षिण चिनी समुद्रातही अमेरिकेनं घातक युद्धनौका तैनात केल्या असून, चीनच्या मुसक्या आवळल्या आहेत.
4 / 10
चीनच्या राज्य मीडिया पीपल्स डेलीने दावा केला आहे की, 23 जुलै रोजी चिनी सैन्याने अमेरिकन विमानांना पळवून लावले.
5 / 10
पीपल्स डेलीने ट्विटरवर एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केली आहे, ज्यात चिनी सैन्याची लढाऊ विमानं अमेरिकन विमानांना इशारा देत ​​आहेत.
6 / 10
पीपल्स डेलीने लिहिले आहे की, जारी केलेल्या ऑडिओवरून असे दिसते की चिनी सैन्य विमानं घुसखोरी करणाऱ्या अमेरिकन सैन्य विमानांना पळवून लावत आहेत.
7 / 10
अमेरिकन विमानं तैवानच्या सामुद्रधुनीच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावाही केला गेला आहे.
8 / 10
डेली मेलच्या वृत्तानुसार, चीनच्या लढाऊ विमानांच्या वैमानिकाने अमेरिकन सैन्य विमानांना इशारा दिला की, तुम्ही त्वरित मार्ग बदला अन्यथा पकडले जाल.
9 / 10
पीपल्स डेलीने प्रसिद्ध केलेल्या ऑडिओमध्ये चिनी पायलट असे म्हणतात की, ही चिनी नौदल आणि हवाई दल सुरक्षेसाठी तैनात आहेत.
10 / 10
आपण चिनी क्षेत्राकडे जात असल्यास त्वरित मार्ग बदला, अन्यथा आपण पकडले जाल. ब्रिटीश वृत्तपत्र डेली मेलने या ऑडिओचे वर्णन अत्यंत संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. कारण जुने फोटो ऑडिओसह वापरले गेले आहेत. त्याचबरोबर या घटनेसंदर्भात अमेरिकेतूनही कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिका