Choe Ryong-hae can become dictator after kim jong un and be real power in north korea
किम जोंगनंतर बहीण नव्हे, 'हे' बनू शकतात उत्तर कोरियाचे हुकूमशहा; संपूर्ण जग म्हणतं 'जल्लाद'! By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 4:21 PM1 / 14हे नाव आहे, उत्तर कोरियाच्या कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते, पोलिट ब्यूरो स्टँडिंग कमिटीचे प्रमुख आणि सैन्याच्या फायरिंग स्क्वॅडचे जनरल चो रयोंग हाए (Choe Ryong-hae).2 / 14जगात चो रयोंग यांची ओळख 'क्रूर लष्करी शासनाचे समर्थक' आणि 'जल्लाद' अशी आहे. अमेरिकेसह यूरोपातील अनेक देशांनी त्यांना मानवतेविरोधातील गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. 3 / 14चो रयोंग हीच ती व्यक्ती आहे, जी किम जोंग आणि त्यांच्या वडिलांच्या आदेशानंतर शत्रूला तोफेच्या तोंडी बांधून उडवायची. 4 / 14चो यांना रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे समर्थक मानले जाते. ते एक सर्वात शक्तीशाली नेते आहेत.5 / 14सध्या चो रयोंग हे ऑर्गनायझेशन ऑफ गाइडन्स डिपार्टमेंटचे चेअरमन आहेत. त्यांना 2018 मध्ये या संस्थेत स्थान देण्यात आले. किम जोंग सुट्टीवर असताना देशाचे सर्व मोठे निर्णय तेच घेतात. 6 / 14यापूर्वी या संस्थेत केवळ किम जोंग यांच्या कुटुंबातील व्यक्तीच सदस्य म्हणून राहत होती.7 / 14ऑर्गनायझेशन ऑफ गाइडन्स डिपार्टमेंट (ODG) ही उत्तर कोरियातील सर्वात शक्तीशाली संस्था आहे. तसेच देशाचे सर्व महत्वाचे निर्णय हीच संस्था घेते. 8 / 14चो रयोंग हे उत्तर कोरियाच्या सैन्याचे व्हाइस मार्शल आहेत. प्रसिद्ध फायरिंग स्क्वॅड तयार करण्याचे श्रेय त्यांनाच दिले जाते. शत्रूला अँटी एअरक्राफ्ट गनसमोर बांधून उडवण्यासाठी हे स्क्वॅड प्रसिद्ध आहे.9 / 14मोठ-मोठ्या लष्करी अधिकाऱ्यांमध्येही चो रयोंग यांची दहशत आहे.10 / 14चो रयोंग यांनी काही दिवसांपूर्वी, ह्वांग प्योंग सो आणि किम वोंग होन्ग या लष्कारी अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा सुनावली होती. मात्र, त्यांना काय शिक्षा दिली? ते जिवंत आहेत की नाही? हे अद्यापही कुणाला माहीत नाही.11 / 14कु-प्रसिद्ध लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमामुळे अमेरिकेसह अनेक देशांनी चो रयोंग यांना बंदी घातली होती.12 / 14असेही बोलले जाते, की 2019 मध्ये किम जोंग यांच्या सांगण्यावरून चो रयोंग यांनी 6 शत्रूंना सार्वजनिकरित्या तोफेच्या तोंडी दिले होते. 13 / 14चो यांनी ऑर्गनायझेशन ऑफ गाइडन्स डिपार्टमेंटमध्ये सामील झाल्यानंतर भ्रष्टाचार, सरकारी नियमांचे उल्लंघन आणि पोलिसांची हत्या, यातील गुन्हेगारांना सार्वजनिकरित्या मृत्यू दंड दिला आहे.14 / 14किम जोंग गादीवर बसल्यानंतर 2012मध्ये लष्कर प्रमुख री योंग हो यांना रास्त्यातून बाजूला करण्यातही चो रयोंग यांची मोठी भूमिका असल्याचे बोलले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications