The clock in Switzerland doesn't have 12 digits
...म्हणून 'या' घड्याळात कधीच 12 वाजत नाही By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 3:21 PM1 / 6सर्वसाधारणपणे आपल्या देशात 12 अंक शुभ समजला जातो. तसेच घड्याळात 12 कधी वाजतील याची देखील आतुरतेने वाट पाहिली जाते. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की, जगात असेही एक घड्याळ ज्यात कधीच 12 वाजत नाही.2 / 6स्वित्झर्लंडच्या सोलोथर्न शहरातील टाउन स्क्वेअरवर एक घड्याळ आहे. या घड्याळात तासांसाठी फक्त अकराच अंक आहे. त्यामुळे या घड्याळात कधीच 12 वाजत नाही.3 / 6स्वित्झर्लंड शहराची सर्वात खास गोष्ट म्हणजे येथील लोकांना 11 अंक खूप आवडतो. येथील कोणत्याही वस्तूची डिझाईन 11 अंकाच्या सारखीच असते. त्याचप्रमाणे शहरातील चर्च आणि चॅपलची संख्या देखील 11-11 आहे. याशिवाय संग्रहालय, टॉवर यांची संख्या देखील 11 आहे.4 / 6सेंट उर्सुस चर्चमध्ये देखील 11 अंकाचे महत्त्व स्पष्ट दिसते. चर्च बनविण्यासाठी 11 वर्ष लागली. येथे जिन्यांचा सेट आहे. त्यातील प्रत्येक सेटमध्ये 11 पायऱ्या आहेत. याशिवाय येथे 11 दरवाजे आणि 11 घंटी आहेत.5 / 6लोकांना 11 अंकाचे एवढे वेड आहे की, 11 वा वाढदिवस देखील ते मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात. तसेच भेटवस्तू देखील अकराच दिल्या जातात.6 / 6स्वित्झर्लंडमध्ये 11 अंकाला महत्व देण्यामागे एक जूनी गोष्ट असल्याचे सांगण्यात येते. सोलोथर्नचे लोक खूप मेहनत करायचे, मात्र तरी देखील त्यांच्या आयुष्यात आनंद नव्हता. त्यानंतर पर्वतांमधून एल्फ येण्यास सुरूवात झाली व त्यांचे आयुष्यच बदलून गेले. एल्फच्या बाबतीत जर्मनीच्या पौराणिक कथांमध्ये वाचायला मिळते. सांगण्यात येते की, त्यांच्याकडे अफाट शक्ती होती आणि जर्मन भाषेत एल्फचा अर्थ 11 होतो. त्यामुळे येथील लोकांनी एल्फला 11 अंकाशी जोडले आणि तेव्हापासून 11 अंकाला महत्त्व देण्यास सुरूवात केली. आणखी वाचा Subscribe to Notifications