The company had to pay Rs 44 lakh to employee after he get skin disease
दिवसातून 20 वेळा धुणे पडले महागात, त्वचारोग झाल्यानंतर द्यावे लागले 44 लाख रुपये By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 6:33 PM1 / 10 लंदन: कोरोना सुरु झाल्यापासून सतत हात धुण्यास सांगितलं जातं. पण, एका बेकरी मालकाला आपल्या कर्मचाऱ्याला सतत हात धुवायला लावणं चांगलंच महागात पडलयं.2 / 10 बेकरीचा मालक आपल्या कर्मचाऱ्याला दिवसातून कमीत-कमी 20 वेळा हात धुवायला लावायचा, असा आरोप सुसान रॉबिन्सन नावाच्या एका कर्मचाऱ्यानं केला आहे.3 / 10 दरम्यान दिवसातून अनेकवेळा साबणानं हात धुतल्यामुळे त्या कर्मचाऱ्याला त्वचेचा गंभीर आजार झाला. यानंतर नुकसान भरपाई म्हणून कंपनीला त्या कर्मचाऱ्याला 43,81,495 रुपये द्यावे लागले.4 / 10 59 वर्षीय सुसान रॉबिन्सन वेस्ट यॉर्कशायरच्या वेकफील्डमधील एका फॅक्टरीमध्ये काम करायचे. ही कंपनी मोठ्या सुपरमार्केट चेनसाठी मफिन, कपकेक आणि इतर बेकरी प्रोडक्ट बनवते.5 / 10 मिररने SWNS वृत्तसंस्थेच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, ख्रिसमससाठी बेकरी प्रोडक्त बनवताना कंपनीनं सहा महिने रॉबिन्सनला दिवसातून वीसवेळा हात धुवायला लावले. 6 / 10 इतक्यावेळा साबनानं हात धुतल्यामुळे रॉबिन्सच्या हाताला खास सुरू झाली आणि या खाजेचं रुपांतर हळुहलू मोठ्या त्वचारोगात झालं.7 / 10 डॉक्टरांकडे गेल्यावर रॉबिन्सनचे अनेक टेस्ट करण्यात आले, त्यातून त्याला एक्जिमा नावाचा आजार झाल्याचं समोर आलं. 8 / 10 डॉक्टरांकडे गेल्यावर रॉबिन्सनचे अनेक टेस्ट करण्यात आले, त्यातून त्याला एक्जिमा नावाचा आजार झाल्याचं समोर आलं. 9 / 10 यानंतर रॉबिन्सनने कंपनीकडे बेकरी प्रोडक्ट बनवताना हातात ग्लोव्ज घालणे किंवा हाताला क्रिम लावण्याची परवानगी मागितली, पण कंपनीने ती मागणी अमान्य केली.10 / 10अखेर रॉबिन्सननं बेकर्स फूड अँड एलाइड वर्कर्स यूनियनसोबत मिळून कंपनीवर 50,000 यूरो म्हणजेच 43,81,495 रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. ही मागणी कंपनीला मान्य करावी लागली. आणखी वाचा Subscribe to Notifications