शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

21 जूनला होणार जगाचा अंत? जाणून घ्या, माया कॅलेंडरच्या दाव्यामागील सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 6:55 PM

1 / 10
कोरोनामुळे जगभरावर मोठे संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत आता आणखीन एक धक्कादायक चर्चा सोशल मीडियावर सुरु होती, ती म्हणजे येत्या रविवारी 21 जून 2020 रोजी जगाचा अंत होणार आहे.
2 / 10
दक्षिण अमेरिकेतील देशात वापरल्या जाणाऱ्या माया कॅलेंडर (Mayan Calender) च्या अनुसार हा दावा करण्यात आल्याचे सुद्धा सांगितले जात होते. तसेच, जगाचा अंत होण्यामागे कोरोनाचे कारण असेल असेही या दाव्यानुसार चर्चा होती.
3 / 10
या चर्चांनी सोशल मीडियावर तुफान अफवा पसरू लागल्या आहेत. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम देत वैज्ञानिकांनी स्पष्टीकरण दिले आहे.
4 / 10
घाबरून जाण्याचे कारण नाही. या सर्व केवळ अफवा आहेत. 21जूनला किंवा येत्या काळात कधीही जगाचा अंत होणार नाही, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
5 / 10
पाओलो तगलोगुइन या वैज्ञनिकाने ट्विटर वर एक व्हिडीओ शेअर करत विचित्र दावा केला होता. 1582 मध्ये सुरु झालेल्या ग्रेगोरियन कॅलेंडरच्या माहितीनुसार एका वर्षातून 11 दिवस कमी झाले होते.
6 / 10
11 दिवस हे वर्षाच्या तुलनेत बरेच कमी वाटत असले तरी सलग 286 वर्ष हे 11 दिवस कमी कमी होत असल्याने साधारण 2012 मध्ये जगाचा अंत होईल असे मानले जात होते.
7 / 10
ग्रेगोरियन कॅलेंडर मधील आणि माया कॅलेंडरमधील फरकानुसार आता आत अजूनही 2012 सुरु आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे 21 डिसेंबर 2012 हे आताचे 21 जून 2020 असून यादिवशी जगाचा अंत होईल असे म्हटले जात आहे.
8 / 10
याचबरोबर, काहींच्या मते माया हे डिस्लेक्सिक असल्यामुळे 2012 आणि 2021 यामध्ये लिहिण्यात काही तरी घोळ झाला होता असेही मानले जाते.
9 / 10
दरम्यान, नासाच्या वैज्ञानिकांनी हे सर्व दवे फोल असल्याचे सांगितले आहे. या सर्व भाकडकथा आहेत यावर पुस्तक लिहिले जाऊ शकते, चित्रपट किंवा नाटक बसू शकते मात्र यामागे विज्ञान किंवा पुरावा नसल्याने यात तथ्य नाही.
10 / 10
एकीकडे जगात महामारी, आग, अतिवृष्टी, टोळधाड आणि अन्य अनेक धक्कादायक प्रकार घडत असताना या अफवेने लोकांमध्ये भीती निर्माण होणे साहजिक आहे मात्र यात सत्य किती हे तपासून पाहणेही तितकेच गरजेचे आहे.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल