शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पूर्व तिमोर देश कोणता? बांगलादेशचे तुकडे करून वेगळा देश निर्माण करण्याचा कट; शेख हसीनांच्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 3:05 PM

1 / 8
पाच दशकांपूर्वी भारताने पाकिस्तानची नांगी ठेचत बांग्लादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. आता याच बांग्लादेशचे दोन तुकडे करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे.
2 / 8
पूर्व तिमोर प्रमाणेच बांगलादेशचे तुकडे करून वेगळा देश निर्माण करण्याचा कट रचला जात असल्याचा दावा हसीना यांनी केला आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी हा दावा केला आहे. बांग्लादेशचे चट्टोग्राम आणि म्यानमारचे काही भाग तोडून बंगालच्या उपसागरात ख्रिश्चन देश निर्माण करण्याचा कट रचला जात असल्याचा दावा हसीना यांनी केला आहे. हा कट कोण करत असल्याचे मात्र त्यांनी सांगितले नाहीय.
3 / 8
या कटाची तुलना हसीना यांनी पूर्व तिमोरशी केली आहे. एकेकाळी मुस्लिम बहुल इंडोनेशियाचा भाग असलेला हा देश पूर्णपणे कॅथलिक झाला आहे. चट्टोग्राम हा भाग समृद्ध बंदरामुळे विकसित आहे. मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय आयात आणि निर्यात होते. सध्या हा भाग मुस्लीमबहुल आहे, येथे हिंदू आणि बौद्ध लोकही राहतात.
4 / 8
या भागाला बांग्लादेशपासून तोडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे वक्तव्य पंतप्रधानांनी केल्याने बांग्लादेशात खळबळ उडाली आहे. बांगलादेशात धर्म बदलण्याचे स्वातंत्र्य आहे, त्यामुळेच ही भीती या लोकांना वाटू लागली आहे. सध्या बांग्लादेशच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ ०.३० टक्के ख्रिश्चन धर्मीय आहेत.
5 / 8
एकेकाळी इंडोनेशियाचा भाग असलेल्या या देशात 1975 पासून पुढील 25 वर्षांत धर्मांतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाले की 90 टक्क्यांहून अधिक लोकांनी मुस्लिम धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. गरिबांना मदत करण्याच्या नावाखाली हे धर्मांतर झाले होते.
6 / 8
यामागे कोणता देश होता किंवा या धर्मांतराचा कोणाला फायदा झाला याची माहिती मिळत नाही. परंतु तेथील प्रसारमाध्यमांनुसार पूर्व तिमोरवर राज्य केलेल्या पोर्तुगिजांनी हे करविले होते. इंडोनेशिया देशा पुन्हा ताकदवर होऊ नये म्हणून असे केले गेले, असा दावा यात केला गेलेला आहे.
7 / 8
१६ व्या शतकापासून ते १९७५ पर्यंत या भागावर पोर्तुगिजांचे राज्य होते. १९७५ मध्ये जसा हा भाग स्वतंत्र झाला तसे इंडोनेशियाने आक्रमण करत तो ताब्यात घेतला. मात्र, युएनच्या दबावामुळे १९९९ मध्ये पूर्व तिमोरवरील ताबा इंडोनेशियाने सोडला. इंडोनेशियानुसार तिमोर हा आधीच आमच्या हातातून निसटला होता. याचे कारण म्हणजे तिथे सामुहिक धर्मांतर झाले होते.
8 / 8
आता या तिमोर देशाचे नाव तिमोर लेस्ते आहे. हा देश इस्रायलएवढा आहे. मे २००२ मध्ये त्याला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळाले. तिमोरच्या लोकांचा धर्म एकच असला तरी भाषा वेगवेगळ्या आहेत. बहुतांश लोक पोर्तुगाली बोलतात तर उर्वरित टेटून, इंडोनेशियाई आणि इंग्रजी बोलतात. इंडोनेशियाई आणि इंग्रजी भाषेला सरकारी कामात राज्य भाषेचा दर्जा आहे.
टॅग्स :BangladeshबांगलादेशIndonesiaइंडोनेशिया