corona again spreading in china 50 lakh people getting tested preparing for lockdown
CoronaVirus News : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचं संकट; तब्बल 50 लाख लोकांची चाचणी अन् लॉकडाऊनची तयारी By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 3:11 PM1 / 10कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोना व्हायरसपुढे हतबल झाले आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 2 / 10कोरोनाने जगभरात थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही 43,824,996 वर पोहोचली आहे. 3 / 10जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 1,165,289 लोकांना आपला जीव गमवाव लागला आहे. तर आतापर्यंत 32,206,606 जणांनी कोरोनाची लढाई जिंकली असून उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 4 / 10चीनच्या वुहानमधून कोरोनाचा प्रसार झाल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्यापैकी यश आलं. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे. 5 / 10चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत असल्याची माहिती समोर आली आहे. चीनमधील एका मोठ्या शहरामध्ये तब्बल 50 लाख नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत. 6 / 10पुन्हा एकदा या संपूर्ण भागामध्ये लॉकडाऊन लागू करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. चीनच्या पश्चिमेकडील शिनजियांगजवळील काशगरमध्ये या चाचण्या करण्यात येणार आहे. 7 / 10कोरोनाचा एक रुग्ण आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कोरोना चाचण्यांना सुरुवात करण्यात आल्यापासून 137 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. 8 / 10झिंजियांगमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याचं सांगितलं आहे. रविवारी दुपारपर्यंत चीनच्या या भागातील 28 लाखांहून अधिक नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. 9 / 10मंगळवारपर्यंत या भागातील 47 लाख नागरिकांच्या चाचण्या पूर्ण करण्यात येतील अशी अपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांना आहे. मार्च महिन्यामध्येच चीनला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आलं. 10 / 10कोरोनाला रोखल्यानंतर आता पुन्हा शिनजियांगजवळच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. म्हणूनच नागरिकांची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications