corona ceiling alarm developed that can detect virus in a room
CoronaVirus News : अरे व्वा! कोरोनापासून खास अलार्म वाचवणार; फक्त 15 मिनिटांत संक्रमित व्यक्तीची माहिती मिळणार, संशोधकांचा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 3:08 PM1 / 16जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 17 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 2 / 16प्रगत देशही कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. काही देशांमध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुन्हा एकदा ल़ॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. 3 / 16देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 2,95,70,881 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 60,471 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2726 जणांचा मृत्यू झाला आहे. 4 / 16कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,77,031 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रिसर्चमधून कोरोनाबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. 5 / 16सर्दी, खोकला झाला तरी कोरोनाची लक्षणं तर नाहीत ना? अशी शंका अनेकांच्या मनात डोकावत असते. मात्र आता एक असा अलार्म तयार करण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या आजुबाजूला असणाऱ्या रुग्णांची माहिती मिळणार आहे. 6 / 16तुमच्या आजूबाजूला एखादा कोरोना रुग्ण असेल तर तुम्हाला तो धोक्याची घंटा देणार आहे. ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी सीलिंक माउंटेड कोविड अलार्म तयार केला आहे. जो रुममधील कोरोनाबाधित व्यक्तीबद्दल 15 मिनिटांत माहिती देईल, असा दावा ब्रिटीश संशोधकांनी केला आहे.7 / 16द संडे टाईम्सच्या रिपोर्टनुसार, कोरोनाग्रस्तांबद्दल माहिती देणारं हे उपकरण येत्या काळात विमानातील केबिन, शाळा , केअर सेंटर आणि घर तसंच कार्यालयांमध्ये स्क्रिनिंगसाठी बसवता येईल. या उपकरणाचा आकार स्मोक अलार्मपेक्षा थोडा मोठा असणार आहे.8 / 16लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन आणि डरहॅम युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी यावर केलेल्या संशोधनाचे प्राथमिक निकाल आशादायी आहेत. डिव्हाईसमधील परिणामाची अचूकता पातळी 98-100 टक्के पर्यंत प्रभावी आहे, असं संशोधकांनी टेस्टिंगनंतर सांगितलं. 9 / 16कोरोना चाचणी आरटीपीसीर (RT-PCR Test) आणि अँटिजेन टेस्टच्या तुलनेतही जास्त प्रभावीपणे कोरोनाबाधितांची माहिती देत आहे. मास्क, होम आयसोलेशन, क्वारंटाईनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेत आहेत. 10 / 16केंब्रिजशायरमधील फर्म रोबो साइंटिफिकने तयार केलेला हा सेन्सर त्वचेद्वारे निर्मित रसायनं शोधून कोरोनाबाधित व्यक्ती ओळखू शकतो. हा सेन्सर कोरोना विषाणूमुळे संक्रमित लोकांच्या श्वासामध्ये असलेल्या रसायनांचं परीक्षण करून निकाल देतो म्हणजेच ती व्यक्ती कोरोनाबाधित आहे की नाही, हे सांगतो. 11 / 16सेन्सर मानवी नाकाद्वारे ओळखता येणाऱ्या सूक्ष्म वासालाही ओळखतो. कोविड अलार्म शोधणाऱ्या या टीमच्या एका संशोधनात दिलेल्या माहितीनुसार, हा सूक्ष्म वास केवळ श्वान ओळखू शकतात मात्र, हा अलार्म त्यापेक्षा जास्त अचूक माहिती देऊ शकेल.12 / 16हा सेन्सर कोरोनाग्रस्त व्यक्तींना शोधू शकतो. बाधिताला कोरोनाची कोणतीही लक्षणं नसली तरी हा सेन्सर अचूक शोध घेऊ शकतो असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 13 / 16भारतात अधिकाधिक लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्यासाठी सरकार सर्वोतोपरीचे प्रयत्न करत आहे. याच दरम्यान लसीकरण मोहीम दुर्गम भागात सहज उपलब्ध करुन देण्याच्या योजनेवरही आता सरकार काम करत आहे.14 / 16सरकारकडून आता देशातील दुर्गम भागात, जिथे पोहचणं कठीण आहे, अशा ठिकाणी ड्रोनच्या (Drones) मदतीने कोरोना लस (Corona Vaccine) देण्याची योजना आखली जात आहे. आयआयटी कानपूरकडून करण्यात आलेल्या एका संशोधनात हे सांगण्यात आलं आहे.15 / 16सध्या देशात कोरोना लस खरेदी करण्याचं काम सरकारी कंपनी एचएचएल (HLL) लाइफकेअर (HLL Lifecare) करत आहे. याची सहाय्यक कंपनी एचएचएल इंफ्रा टेक सर्विसेज लिमिटेडने (HLL Infra Tech Services Limited) इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून (ICMR) देशातील दुर्गम भागात कोरोना लस पोहोचवण्यासाठी 11 जून रोजी निविदा मागवण्यात आल्या आहेत.16 / 16तेलंगणामध्ये ड्रोनद्वारे कोरोना लस पोहोचवण्याच्या निर्णयावर काम करत आहे. देशातील दुर्गम भागात कोरोना लस पोहोचवण्यासाठी पाहण्यात येणाऱ्या या ड्रोनबाबत ICMR नेदेखील अभ्यास केला आहे. लसीकरणाच्या कामासाठी अशा ड्रोनचा वापर केला जाईल, जे 35 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतील. तसेच 100 मीटर उंचीपर्यंत उडू शकतील. आणखी वाचा Subscribe to Notifications