या देशात बनतंय कोरोनाचं समूळ नष्ट करणारं औषध, उंदरावरील प्रयोग यशस्वी By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 9:13 AM
1 / 12 कोरोना महामारीमुळे देशात गेल्या काही महिन्यांपासून विदारक चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं आपण पाहिलं. 2 / 12 आता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असून लसीकरणाकडेही सरकारने प्राधान्याने लक्ष दिले आहे. त्यामुळे, एकीकडे लसीकरण आणि दुसरीकडे कोरोना अटकाव घालण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 3 / 12 कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. ऑस्ट्रेलियातील एका संशोधकाने एँटी व्हायरस औषध बनवले असून उंदरावर त्याचा प्रयोगही करण्यात आला आहे. 4 / 12 उंदराच्या फेफड्यातील 99.99 टक्के कोरोना पार्टीकल्स नष्ट करण्यात या औषधाला यश आले आहे. मात्र, या औषधाला बाजारात येण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. 5 / 12 ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठाच्या मेन्जिस हेल्थ इंस्टीट्यूने ही औषधप्रणाली निर्माण केली असून यास पुढची पायरी मानली जात आहे. जीन सायलेसिंग या वैद्यकीय प्रक्रियेनुसार ही कार्य करते. 6 / 12 इंजेक्शनच्या सहाय्यानेच ही ट्रीटमेंट केली जाणार आहे. जीन सायकलेंगिच्या सहाय्याने आरएनएच्या उपयोग व्हायरसवर हल्ला करण्यासाठी करण्यात येईल. यापूर्वी फायजर आणि मॉडर्न या लशींमध्येही आरएनएला मॉडिफाय करण्यात आलंय. 7 / 12 कोरोना आजाराने गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांसाठी ही नवीन औषधप्रणाली विकसित करण्यात आली आहे. या विद्यापीठाच्या प्रमुख रिसर्चर प्रोफेसर निगेल मैकमिलन यांनी म्हटले की, या उपचारपद्धतीने व्हायरसचा नवीन स्ट्रेनमध्ये बदलाव रोखता येईल. 8 / 12 या उपचार पद्धतीच्या वापराने देशातील कोरोनाबाधित मृत्यूदर मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा मॅकमिलन यांना विश्वास आहे. कोविड पॉझिटीव्ह रुग्णांच्या फेफड्यात जाऊन व्हायरस नष्ट करण्याचं काम हे औषध करते 9 / 12 सध्या केवळ उंदरांवरच या उपचारपद्धतीचा अवलंब केला आहे, त्यामुळे मानवी जीवनावर ही औषधप्रणाली किती प्रभावी ठरेल हे आत्ताच निश्चितपणे सांगता येणार नाही. 10 / 12 यापूर्वीही रेमडेसीवीर या अँटी व्हायरल इंजेक्शनच्या माध्यमातून कोरोनावर उपचार करण्यात आले आहेत. मात्र, ही उपचारपद्धती कोरोना समूळ नष्ट करेल, असा दावा करण्यात येता आहे. 11 / 12 दरम्यान, गेल्या वर्षभरापासून ऑस्ट्रेलियातील या विद्यापीठात कोरोनावर रिसर्च सुरू आहे. लॉकडाऊनंतर एप्रिल महिन्यापासून पुन्हा ते काम गतीने करण्यात येत आहे. 12 / 12 सध्यी ही ट्रीटमेंट क्लिनीकल ट्रायलसाठी पुढील प्रकियेतून जात आहे. त्यामुळे हे औषध बाजारात येण्यासाठी मोठा अवधी लागणार असून 2023 मध्ये औषध बाजारात येईल, असा अंदाज आहे. आणखी वाचा