corona in china shanghai confirmed first death since lockdown 3 people died
चीनमध्ये कोरोनाचा कहर! शांघायमध्ये लॉकडाऊननंतर एकाच दिवसात तीन जणांचा मृत्यू By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 12:05 PM1 / 9शांघाय : चीनमधील सर्वात मोठे शहर असलेल्या शांघायला सध्या कोरोनाचा मोठा फटका बसत आहे. रविवारी येथे तीन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. शहरात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचा स्थानिक प्रशासनाचा दावा आहे. 2 / 9मात्र, 'झिरो डेथ'च्या दाव्यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, 2019 मध्ये वुहानमध्ये कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर शांघाय हे आतापर्यंत चीनमधील सर्वाधिक संक्रमित शहर बनले आहे, असे म्हटले जात आहे. 3 / 9एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, 25 अडीच लोकसंख्या असलेल्या शांघायच्या म्युनिसिपल गव्हर्नमेंटनुसार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये दोन महिला आणि एक पुरुष आहे. महिलांचे वय 89 आणि 91 वर्षे होते तर पुरुषाचे वय 91 वर्षे होते. 4 / 9या रुग्णांना आधीच हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असे अनेक आजार होते. या लोकांना कोरोनाची लसही मिळाली नव्हती. रुग्णालयात दाखल करूनही प्रकृती गंभीर होत असल्याचे सांगण्यात आले. वाचवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले.5 / 9याआधी मार्चमध्ये उत्तर-पूर्व जिलिन प्रांतात दोन मृत्यूची पुष्टी झाली होती. चीनमधील कोरोनामुळे गेल्या वर्षभरातील पहिल्यांदाच तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, इतक्या कमी मृत्यू संख्येवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. 6 / 9बीबीसीच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की शांघायमधील याच रुग्णालयात एका आठवड्यात किमान 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी कोणाही लस घेतली नव्हती. शांघायच्या म्युनिसिपल हेल्थ कमिशनने रविवारी गेल्या 24 तासांत येथे 3238 जणांना कोरोना झाल्याची माहिती दिली. 7 / 9सिन्हुआ न्यूज एजन्सीनुसार, लक्षणे नसलेली 21,582 प्रकरणे आढळून आली. संख्येच्या दृष्टीने ही संख्या कमी वाटू शकते, मात्र चीनने कोरोनाबाबत झिरो कोविड पॉलिसी लागू केली आहे. अशा स्थितीत प्रकरणांमध्ये किंचित वाढ झाल्यानंतरही कडक निर्बंध लागू केले जात आहेत.8 / 9शांघायमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लोकांच्या घराबाहेर पडण्यावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. किरकोळ लक्षणे दिसली तरी क्वारंटाईन करण्याच्या सूचना आहेत. 9 / 9क्वारंटाईन सेंटरमधील जागा कमी झाल्याची स्थिती आहे. प्रशासनाने बंदोबस्त करूनही अनेक ठिकाणी लोकांसमोर खाण्यापिण्याचे, औषधांच्या पुरवठ्याचे संकट निर्माण झाले आहे. झिरो कोविड पॉलिसीच्या कठोर निर्बंधांमुळे लोकांमध्ये निराशा वाढत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications