शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोनाचा प्रकोप! शांघाईमध्ये अन्नपदार्थांचा तुटवडा; पॉझिटिव्ह रुग्ण झाले गायब, परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 2:45 PM

1 / 12
चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा महामारीची सुरुवात झाली तेव्हा जसे रुग्ण आढळून येत होते. तसेच रुग्ण आढळत आहेत.
2 / 12
आर्थिक राजधानी असलेल्या शांघाईमध्ये अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊन लागू करण्यात आला असून लोकांना कारणाशिवाय बाहेर पडण्यास परवानगी नाही.
3 / 12
शांघाईमधील रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरली आहेत. सर्व वॉर्ड भरलेले असून नव्या रुग्णांना जागाच शिल्लक राहिलेली नाही. आरोग्य यंत्रणेवर देखील ताण आला असून प्रशासनाची चिंता वाढली आहे.
4 / 12
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या झीरो कोविड पॉलिसीमुळे लोक आता त्रस्त झाले आहेत. येथे लोकांकडे अन्नपदार्थ देखील शिल्लक राहिलेले नाहीत. एका वयोवृद्ध महिलेने अन्नासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचं देखील सांगितलं आहे.
5 / 12
लोकांनी दावा केला आहे की खाण्या-पिण्याचं सामान संपत आहे. तसेच सुपरमार्केट आणि दुकानातील स्टॉक देखील कमी होत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
6 / 12
शांघाईमध्य़े कोरोना संक्रमित असलेल्या लोकांना गायब केलं जात आहे. कारण या लोकांना आयसोलेट करण्यासाठी जागाच शिल्लक नाही. त्यांना दुसऱ्य़ा ठिकाणी पाठवलं जात आहे. कमेंटेटर चेन फेंग याने याबाबत माहिती दिली आहे.
7 / 12
प्रत्येक प्रांतात हजार किंवा दोन हजार लोकांना पाठवलं जात आहे. त्यांना जबरदस्तीने पाठवण्यात येत आहे. चीनमधील कोरोनाने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
8 / 12
जवळपास 2.6 कोटी लोकसंख्या असलेल्या शांघाई प्रांतातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चिनी सैन्य आणि तब्बल 2,000 हून अधिक वैद्यकीय कर्मचारी पाठवण्यात आले आहेत, जेणेकरून रूग्णांवर उपचार करता येतील.
9 / 12
चीनमध्ये संसर्गाची सर्वाधिक वाढ शांघाईमध्येच होत आहे. येथे दररोज कोविड-19 चे रुग्ण वाढत आहेत. त्याच वेळी, संक्रमणाची चेन थांबवण्यासाठी लॉकडाऊनमुळे लाखो लोक घरामध्येच बंद आहेत.
10 / 12
चीन हा जगातील सर्वाधिक लसीकरण झालेल्या देशांपैकी एक आहे. चीनमध्ये, 88% पेक्षा जास्त लोकांना कोरोना लसीचा डबल डोस मिळाला आहे, परंतु असे असूनही, चीनमधील केवळ 52% वृद्ध लोकांना म्हणजेच 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना डबल डोस मिळाला आहे.
11 / 12
परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की शांघाईमधील कोणत्याही रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यासाठी जागा उरलेली नाही. असे असूनही, चीनचा दावा आहे की शांघाईमध्ये आतापर्यंत एकाही व्यक्तीचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला नाही.
12 / 12
चीनच्या मोठ्या व्यावसायिक हब शांघाईमध्ये येत्या शुक्रवारपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला. बँकिंग आणि इतर कामे विस्कळीत होऊ नयेत यासाठी शांघाईमधील सुमारे 20 हजार कर्मचारी कार्यालयात राहत आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था सरकारने केली आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन