शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : भय इथले संपत नाही! महिलांपेक्षा पुरुषांसाठी कोरोना जास्त धोकादायक; रिसर्चमध्ये मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 5:34 PM

1 / 8
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान कोरोनाबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोना व्हायरस महिलांपेक्षा पुरुषांसाठी जास्त धोकादायक आहे. याचे कारण ACE-2 प्रोटीन आहे. रिसर्चमध्ये ही बाब समोर आली आहे.
2 / 8
आयसायन्स मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात संशोधकांनी याबाबत उंदरांवर प्री-क्लिनिकल संशोधन केलं आहे. या अभ्यासातून असं समोर आलं आहे की, कोरोना दरम्यान पुरुषांमध्ये ACE-2 प्रोटीनची कमतरता कोरोनाच्या गंभीर स्थितीसाठी जबाबदार आहे.
3 / 8
अभ्यासातून समोर आले आहे की, कोरोनाची लागण झाल्यानंतर, कोरोना व्हायरस रुग्णाच्या प्रोटीन पेशींपर्यंत पोहोचतो आणि ACE-2 वर परिणाम करतो. ACE-2 सेलच्या बाह्य पृष्ठभागावर स्थित आहे. ब्लड प्रेशर आणि सूज नियंत्रित ठेवण्यासोबतच अवयवांमध्ये जास्त सूज आल्याने होणारे नुकसानही टाळते.
4 / 8
रिसर्चमध्ये असेही समोर आले आहे की, कोरोनाची तीव्रता आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत पुरुषांची संख्या महिलांपेक्षा जास्त आहे. मात्र, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
5 / 8
कॅनडातील टोरंटो विद्यापीठाचे प्राध्यापक. हाइबो झांग म्हणतात की ACE-2 प्रोटीन एन्कोड करणारे जीन X गुणसूत्रावर स्थित आहे. याचा अर्थ असा की महिलांमध्ये जीनच्या दोन प्रती असतात, तर पुरुषांकडे फक्त एक असतो.
6 / 8
रिसर्चमध्ये असे दिसून आले की निरोगी पुरुष आणि महिलांमध्ये ACE-2 प्रोटीनची पातळी समान होती, तर कोरोनाची लागण झाल्यानंतर पुरुषांमध्ये ACE-2 प्रोटीनची कमतरता दिसून आली. मात्र बाधित महिलांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
7 / 8
अशा परिस्थितीत, संशोधकांचा असा विश्वास आहे की पुरुषांमध्ये कोरोनाच्या अधिक गंभीर प्रकरणांचे कारण ACE-2 ची कमतरता असू शकते. यानंतर, संशोधकांनी प्रयोगशाळेत तयार केलेले ACE-2 प्रोटीन थेट पुरुषांच्या फुफ्फुसात इनहेलरद्वारे पोहोचवले.
8 / 8
यानंतर, असे आढळून आले की कोरोना बाधित पुरुषांना दररोज ACE-2 श्वास घेतल्याने त्यांच्या फुफ्फुसात व्हायरसचे प्रमाण कमी होते. अनेक देशात आता पुन्हा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या