corona patient recovering but after two months these severe symptoms appear
कोरोना पाठ सोडेना! बरा होतोय पण दोन महिन्यांनंतर दिसताहेत ही गंभीर लक्षणे By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 4:08 PM1 / 10कोरोनाने जगभरात थैमान घातलेले आहे. अमेरिका, इटली, रशियाच्या तुलनेत भारतात कोरोनाचे रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण कमी असल्याने एक मोठा दिलासा देशवासियांना मिळाला आहे. मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होत आहेत. 2 / 10देशात रुग्ण बरे होण्याचा आकडा जरी मोठा असला तरीही इटलीच्या संशोधकांनी रुग्ण बरा झाल्याच्या दोन महिन्यांनंतर मोठा इशारा दिला आहे. जामा जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात याबाबत लिहिण्यात आले आहे. 3 / 10इटलीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की, कोरोना झाल्यानंतर दोन महिन्यांनीदेखिल रुग्णांना दमल्यासारखे वाटत आहे.4 / 10इटलीमध्ये 143 बरे झालेल्या रुग्णांवर अभ्यास करण्यात आला. या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले होते. यापैकी 90 टक्के लोकांमध्ये कोरोना झाल्यानंतर 2 महिन्यांनी काही लक्षणे दिसत होती. थकवा जाणवने, श्वास घेण्यामध्ये त्रास होणे, गुडघेदुखी सारखी लक्षणे आहेत. 5 / 10रोमच्या एका हॉस्पिटलचे डॉक्टर अँजेलो कार्फी यांनी या अभ्यासाचे नेतृत्व केले. डेली मेलच्या रिपोर्टनुसार अभ्यासामध्ये केवळ 12.5 टक्के कोरोनाबाधितांनाच 60 दिवसांनी या लक्षणांपासून मुक्तता मिळू शकली आहे. 6 / 10अभ्य़ासावेळी या बरे झालेल्या रुग्णांनी सांगितले की, त्यांचे आयुष्य बदलले आहे. आधीसारखेच चांगले आयुष्य जगात येत नाहीए. तज्ज्ञांनी हा अभ्यास खूपच चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. 7 / 10याआधी एका अभ्यासमध्ये कोरोनामुळे ज्या लोकांचा चव पाहण्याची किंवा वास घेण्याची शक्ती गेली त्यापैकी 10 टक्के रुग्णांचे एक महिना झाला तरीही हे लक्षण पाठ सोडत नाही. 8 / 10कोरोना हा नवा आजार असल्याने डॉक्टरांनाही याबाबत काहीच कल्पना नाहीय. यामुळे सर्वत्र कोरोनाबाधित रुग्णांवर कोरोनाचा होणारा परिणामांचा अभ्यास केला जात आहे. 9 / 10इटलीतील अभ्यासामध्ये आणखी एक बाब समोर आली आहे. कोरोनाने बरे झालेल्या रुग्णांपैकी 55 टक्के लोकांना दोन महिन्यांनंतर तीन किंवा त्याहून अधिक लक्षणे दिसून येत आहेत. तर 32 टक्के रुग्णांमध्ये एक किंवा दोन लक्षणे दिसून येत आहेत. 10 / 1043 टक्के रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. 21 टक्के लोकांना छातीत दुखत होते. हे सारे रुग्ण उपचारानंतर कोरोना निगेटिव्ह आले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications