शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccine : रेस्टॉरंट्समध्ये फ्री लंच, बीयर-मद्य आणि गांजा; कोरोनावरील लस घेण्यासाठी दिल्या जाताहेत अजब ऑफर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 3:36 PM

1 / 7
देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. कोरोनाची लस घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्यासाटी विविध ऑफर्स दिल्या जात आहेत. यामध्ये रेस्टॉरंटमध्ये मोफत भोजनापासून ते फ्रीमध्ये बीयर देण्यापर्यंततच्या ऑफर्स दिल्या जात आहेत.
2 / 7
भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये उबेर या कॅब सर्व्हिस कंपनीने कोरोनाची लस घेण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तींना मोफत प्रवासाची सुविधा देण्याची घोषणा केली आहे.
3 / 7
चीनमध्येही कोरोनावरील लस घेणाऱ्यांना सरकार आणि कंपन्या विविध प्रकारच्या ऑफर्स देत आहेत. तर हेनान प्रांतातील एका शहरात स्थानिक प्रशासनाने लस न घेणाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा इशारा दिला आहे. तसेच मुलांचे शिक्षण थांबवण्याची आणि घर जप्त करण्याची धमकी दिली आहे.
4 / 7
अमेरिकेमध्ये मॅकडोनाल्डस, एटी अँड टी, इंसाकार्ट, टार्गेट, ट्रेडर जोस, कोबानी सारख्या कंपन्यांनी कोरोनावरील लस घेणाऱ्या स्टाफला सुट्टी आणि रोख रक्कम देण्याची घोषणा केली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना लसीकरण केंद्रापर्यंत जाण्यासाठी ३० डॉलर म्हणजे सुमारे २२०० रुपयांपर्यंत रोख रक्कम देण्याची घोषणा केली आहे.
5 / 7
अमेरिकेमधील प्रसिद्ध डोनट कंपनी क्रिस्पी क्रीमने लस घेणाऱ्यांसाठी २०२१ पर्यंत दररोज एक डोनट मोफत देण्याची ऑफर दिली आहे. त्यासाठी लोकांना केवळ मॉडर्ना, फायझर किंवा जॉन्सन अँड जॉन्सन यापैकी एक कोरोनावरील लस घेतल्याचे कार्ड दाखवावे लागेल.
6 / 7
अमेरिकेमधील ओहियो येथे मार्केट गार्डन ब्रुअरीने कोरोनावरील लस घेणाऱ्या पहिल्या २०२१ जणांना पाच वेळा मोफत बीअर देण्याची घोषणा केली आहे.
7 / 7
तर मिशिगनम्ये मेडिकल मरिजुआना म्हणजे गांजा विकणाऱ्या कंपनीने कोरोनावरील लस घेणाऱ्या लोकांना मोफत रोल्ड जॉईंट (गांजा) पुरवण्याचे आश्वासन दिले आहे.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य