Corona Vaccine: अचानक! कोरोना लसीच्या दोन डोसनी काम केले; या देशात 94 टक्क्यांनी रुग्ण घटले By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 3:20 PM
1 / 13 भारतात आपत्कालीन कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. आरोग्य अधिकारी, डॉक्टर, कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात आली. ज्यांना एक महिना पुरा झाला त्यांना आता दुसरा डोस देण्यास सुरुवात झाली आहे. 2 / 13 कोरोना लसीचे साईड इफेक्ट पाहून यापैकी अनेक लाभार्थ्यांनी काही ना काही कारणे सांगून कोरोना लस टाळली, काहींनी प्रयत्न केला. परंतू अशांसाठी अत्यंत वाईट बातमी आहे. 3 / 13 कोरोना लस टोचल्यानंतर पुढचे ४-५ दिवस अस्वस्थ वाटणे, ताप येणे आदी साईड इफेक्ट दिसले तरीही भारताचा मित्र असलेल्या इस्त्रायलमधून एक चांगली आणि दिलासा देणारी बातमी आली आहे. 4 / 13 इस्त्रायलमध्ये आतापर्यंत दोन डोस देण्यात आले आहेत. याचा मोठा फायदा तेथील लोकांना झाला आहे. इस्त्रायलमध्ये जेवढ्या वेगाने कोरोना लसीकरण झाले तेवढ्याच वेगाने तेथील कोरोनाच्या रुग्णांचे आकडे खाली घसरले आहेत. 5 / 13 इस्त्रायलने केलेल्या नव्या अभ्यासात असे दिसले आहे की, फायझरची लसीचा दुसरा डोस दिल्याने देशातील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने घसरला असून तो 94 टक्क्यांनी कमी झाला आहे. 6 / 13 फायझर-बायोएनटेकच्या कोरोना लसीकरणामुळे कोरोनाची लक्षणे दिसणारे आणि गंभीर रुग्णांच्या संख्या घटली आहे. 7 / 13 हा अभ्यास इस्त्रायलच्या सर्वात मोठ्या हेल्थ केअर प्रोव्हायडर क्लॅलिटच्या संशोधकांनी केला आहे. हा तेथील आजवरचा सर्वात मोठा लसीकरण अभ्यास आहे. हा अभ्यास फायझरची लस घेणाऱ्या 6 लाख लोकांवर करण्यात आली. 8 / 13 रॉयटर्सने याचे वृत्त दिले आहे. ज्या लोकांना कोरोना लस मिळाली नाही, त्यांच्यातुलनेत लस मिळालेल्या लोकांमध्ये ताप, श्वास घेण्याची समस्या आदी कोरोनाची लक्षणे 94 टक्क्यांनी कमी झाली आहेत. 9 / 13 याचबरोबर लसीचे दोन डोस घेतल्यानंतर अशा प्रकरणांमध्ये 92 टक्क्यांची घट झाली. यामध्ये हॉस्पिटलमध्ये भरती करणे, आयसीयू किंवा व्हेंटिलेटरची गरज भासत होती. ही अभ्यास अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. 10 / 13 फायझरच्या दाव्यानुसार कोरोना लस 95 टक्के प्रभावी दिसून आली होती. आता क्लॅलिटनेदेखील यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब केल्यासारखेच आहे. 11 / 13 क्लॅलिटचे मुख्य संशोधक रॅन बालिसर यांनी सांगितले की, दुसरा डोस दिल्यानंतर एका आठवड्यातच आम्हाला हे दिसले. सामान्य नागरिकांवर कोरोना लस काम करू लागली. हे एकदम तसेच जसे क्लिनिकल ट्रायलमध्ये दिसून आले. 12 / 13 भारतात फायझरने सर्वात आधी कोरोना लसीच्या आपत्कालीन लसीकरणासाठी अर्ज केला होता. परंतू त्यानंतर अर्ज करणाऱ्य़ा सीरम आणि हैदराबादच्या कंपनीला मंजुरी देण्यात आली. अखेर फायझरने जवळपास दोन महिने वाट पाहून अर्ज मागे घेतला. 13 / 13 परंतू, भारतातही लस घेतल्यानंतर लोकांना कोरोना झाल्याचे दिसून आले होते. मात्र, दुसरा डोस घेतल्यानंतर यामध्ये नक्कीच सुधारणा दिसून येईल. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना कोरोना होण्याचा धोका मोठा आहे. देशात अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आणखी वाचा