शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus : 72 वर्षांचे आजोबा 43 वेळा कोरोना पॉझिटिव्ह! त्रस्त होऊन पत्नीला म्हणाले- आता मरू दे; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 10:21 PM

1 / 10
इग्लंडमध्ये कोरोना विषाणूचे एक असे प्रकरण समोर आले आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. येथील ब्रिस्टलमध्ये राहणाऱ्या एका 72 वर्षीय आजोबांची कोरना टेस्ट तब्बल 43 वेळा पॉझिटिव्ह आली होती. डेव्ह स्मिथ (Dave Smith) असे या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, ही वृद्ध व्यक्ती सलग 10 महिने कोरोना पॉझिटिव्ह होती. (Corona Virus British man had covid-19 for 10 months in a row tested positive 43 times)
2 / 10
एवढ्या दीर्घकाळ कुठल्याही व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होण्याची ही पहिलीच घटना आहे. डेव्ह स्मिथ, व्यवसायाने सेवानिवृत्त ड्रायव्हिंग इंस्ट्रक्टर, कोरोनाची लागण झाल्यावर त्यांना सात वेळा रुग्णालयात दाखल करावे लागले. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत स्मिथ यांनी एवढे दिवस त्याच्या शरीरात व्हायरस कसा राहिला हे सांगितले.
3 / 10
स्मिथ म्हणाले, 'माझी शक्ती पूर्णपणे कमी झाली होती आणि मी मोठ्या प्रयत्नाने काही उचलू शकत होतो. एका रात्री मला सलग पाच तास खोकला येत होतो. मी पूर्णपणे आशा सोजली होती. यानंतर मी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना बोलविले. त्यांच्याशी शांतपणे बोललो आणि त्यांना गुडबाय म्हणालो.
4 / 10
आजारपणाच्या काळात स्मिथ यांचे वजन 63 किलोपर्यंत कमी झाले होते. स्मिथ आपल्या पत्नीला म्हणाले, “आज रात्री मी मरण पावलो तर हैराण होऊ नकोस. जेव्हा मी झोपायला जात असे, तेव्हा मला असे वाटे की झोपेत असतानाच मी शांततेत मरेन. '
5 / 10
स्मिथ म्हणाले, 'मी माझी पत्नी लिनला म्हणालो की, मला जाऊ दे, मला स्वतःतच अडकल्यासारखे वाटत आहे. हे आता आणखीनच अवघड झाले आहे. तर, लिन म्हणाल्या, 'अम्हाला अनेक वेळा असे वाटले, की स्मिथ आता आणखी सामना करू शकणारन नाहीत.'
6 / 10
स्मिथ यांच्यावर अँटी-व्हायरल औषधांच्या नव्या मिश्रणाने उपचार करण्यात आला. त्यांच्या उपचारासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागला. त्यांना जेव्हा डॉक्टरांकडून माहिती मिळाली, की त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, तेव्हा त्याच्या त्यांच्या कानांवर विश्वासच बसला नव्हता.
7 / 10
यानंतर, डॉक्टरांनी त्यांना आठवडाभर थांबल्यानंतर पुन्हा एकदा चाचणी घेण्याचा सल्ला दिला आणि आठवडाभरानंतरही त्याचा अहवाल निगेटिव्हच आला.
8 / 10
स्मिथ यांनी शॅम्पेनची बाटली उघडून कोविड निगेटिव्ह आल्याचा आनंद साजरा केला. स्मिथ म्हणाले, “आमच्याकडे बऱ्याच दिवसांपासून शँपेनची बाटली होती. सहसा आम्ही मद्यपान करत नाही, पण त्या रात्री आम्ही ती बाटली उघडून निगेटिव्ह अहवालाबद्दल आनंद साजरा केला.
9 / 10
यावर डॉक्टरांचे म्हणणे आहे, की नव्या औषधाच्या मिश्रणाबरोबरच, स्मिथ त्यांच्या दृढ इश्चाशक्तीने बरे झाले, हे नाकारता येणार नाही. त्याच्यावर या औषधाचा एक प्रकारे प्रयोग केला गेला होता, मात्र औषधानेही त्यांच्यावर परिणाम केला, हाही एक योगायोगच आहे.
10 / 10
कोरनातून स्मिथ 290 दिवसांनंतर बरे झाले. या प्रकरणावर वैज्ञानिकही अभ्यास करत आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरmedicinesऔषधं