Corona Virus: China benefits greatly from corona virus; Proof with a photo by NASA pnm
Corona Virus: कोरोनाने जे 'करून दाखवलं', ते कुणालाच नसतं जमलं; 'नासा'ने दिला पुरावा By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 12:39 PM1 / 10कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव चीनच्या वुहान शहरातून झाला. या व्हायरसमुळे अनेक जणांचे जीव गेले. संसर्गजन्य असलेल्या या व्हायरसला रोखण्यासाठी चीन प्रशासनाने अनेक खबरदारी घेतली. 2 / 10या व्हायरसमुळे चीनच्या लोकांवर दहशतीचं सावट निर्माण झालं. वुहान शहरात याची तीव्रता अधिक जाणवत होती. याठिकाणी लोकांना घरामध्ये कैद करुन ठेवलं होतं. लोकांनी एकत्र जमू नये याची काळजी चीन सरकारने घेतली. 3 / 10चीनमध्ये पसरलेल्या या व्हायरसमुळे चीनला आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले, अनेक कंपन्या बंद पडल्या, उत्पादन विक्रीत घट निर्माण झाली. चीनच्या अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 4 / 10या संकटातून चीनला प्रचंड नुकसान सहन करावे लागले असले तरी एक फायदा मात्र चीनचा झाला. ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना!5 / 10चीनमध्ये या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात प्रदूषणाची पातळी जानेवारीच्या तुलनेत खूपच कमी झाली. कंपन्या बंद आणि रस्त्यांवरील वाहनांच्या संख्येत मोठी कपात झाल्याचे परिणाम जाणवले. 6 / 10कोरोना व्हायरसचा चीनच्या उद्योग आणि ट्रॅव्हल यंत्रणेवर खूप वाईट परिणाम झाला आहे. यामुळे चीनमधील उपग्रह प्रतिमेद्वारे प्रदूषण कमी होत असल्याचं दिसून येत आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने ही छायाचित्रे घेतली आहेत. 7 / 10नासाच्या फोटोंमधून चीनमध्ये गेल्या महिन्यात नायट्रोजन डाय ऑक्साईडची पातळी कमी होत असल्याचे दिसून आले होते, हा बदल अंशतः व्हायरस थांबविण्याच्या प्रयत्नांमुळे झाला आहे, जो आर्थिक मंदीमुळे झाला होता. 8 / 10नायट्रोजन डाय ऑक्साईडच्या पातळीत मोठी घट झाली असून वाहने, उर्जा प्रकल्प आणि कारखान्यांमधून सोडण्यात येणारा विषारी वायू बंद झाल्याने प्रदूषणाची पातळी आधीच्या तुलनेत खाली आली आहे. हरितगृह वायूंचे उत्सर्जनही कमी झाले आहे.9 / 102008 मध्ये झालेल्या आर्थिक मंदीच्या काळात नायट्रोजन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी झाले होते, परंतु त्यावेळी प्रदूषणाच्या पातळीत घट ही आजच्या तुलनेत खूपच कमी होती.10 / 10संशोधन वैज्ञानिक फी लिऊ यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या घटनेमुळे अशाप्रकारे व्यापक प्रदुषणात कमी होणं हे पहिल्यांदाच पाहण्यात आलं आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी उत्पादकांनी कारखाने बंद ठेवले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications