शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : कोरोनाचे थैमान! चीनमध्ये अंत्यसंस्कारासाठी जागाच शिल्लक नाही; डॉक्टरांवरही मोठा दबाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 3:35 PM

1 / 10
कोरोना महामारीमुळे चीनमध्ये हाहाकार माजला आहे. देशात दररोज शेकडो कोरोना बाधित लोकांचा मृत्यू होत आहे. रुग्णालयांची अवस्था पूर्णपणे बिकट झाली आहे. सरकार कोरोनामुळे मृत्यूची संख्या लपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि सर्वकाही सामान्य असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.
2 / 10
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमधील डॉक्टरांना कोविड-19 संबंधित मृत्यू लपविण्यास भाग पाडले जात आहे. चीनमध्ये कोविडमुळे मृत्यूची संख्या कमी ठेवण्यासाठी, सेन्सॉरशिप व्यतिरिक्त, चीन सरकारने नियम आणि प्रक्रियांमध्ये बदल लागू केले आहेत.
3 / 10
चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे, परंतु सरकार नियम बदलून डॉक्टरांना कोविडशी संबंधित मृत्यू लपविण्यास भाग पाडत आहे. मृत्यूचे दाखले अद्ययावत होण्यास उशीर होऊ नये म्हणून नियमातील बदल लागू करण्यात आला आहे. चीनमधील अधिकाऱ्यांनीही त्यांच्या अधिकृत संख्येत रुग्णालयाबाहेरील कोविड मृत्यू जोडणे बंद केले आहे.
4 / 10
वाढत्या जागतिक दबावादरम्यान, चीनने उघड केले की 2022 मध्ये डिसेंबरच्या सुरुवातीपासून ते डिसेंबरच्या मध्यापर्यंत सुमारे 60,000 कोविड-संबंधित मृत्यू झाले. VAA (Voices Against Autocracy) नुसार, अनेकांना वाटले की वास्तविक संख्या खूप जास्त आहे आणि बीजिंगवर अंडररिपोर्टिंगचा आरोप केला आहे.
5 / 10
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) चीनला अधिक तपशीलवार डेटासाठी आग्रह केला. जागतिक आरोग्य संघटनेने चीनमधील व्हायरसच्या प्रकोपाची गंभीरता कमी दाखवल्यावर चिंता व्यक्त केली होती. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
6 / 10
चीनमध्ये, गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस, कोविड संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आणि रुग्णालये भरू लागली. अनेक रुग्णांना बेड न मिळाल्याने ते जमिनीवर पडलेले दिसले. अंत्यसंस्कारासाठी जागाही उपलब्ध नव्हती. स्मशानभूमीही पूर्ण भरली होती. मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी लोकांना अनेक दिवस वाट पाहावी लागली.
7 / 10
चीन सरकारने कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येवर मौन बाळगले आहे. सरकारने नियमित हेल्थ बुलेटिन जारी करणे बंद केले, ज्यामुळे कोविड परिस्थितीबद्दल संभ्रम निर्माण झाला. चिनी शास्त्रज्ञ आणि सरकारी अधिकारी वू झुन्याओ यांच्या सोशल मीडिया पोस्टने उघड केले आहे की चीनच्या 80 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला कोविडची लागण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
8 / 10
चीनने 8 जानेवारी रोजी कोरोनामुळे मृतांचा आकडा जाहीर केला, त्यानुसार महामारी सुरू झाल्यापासून केवळ 5,272 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 60 हजार मृत्यूंपेक्षा 10 पट अधिक मृत्यू झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कारण कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालये भरली आहेत.
9 / 10
चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान, कोरोनामुळे येथे दररोज 36 हजार मृत्यू होण्याची शक्यता आहे. कारण लोक नववर्ष साजरं करण्यासाठी आपल्या घरी जाणार आहेत. झिरो कोविड पॉलिसी रद्द केल्यानंतर देश सध्या विनाशाच्या मध्यभागी असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
10 / 10
चीनने केवळ हॉस्पिटलमधील मृत्यूंचा विचार केला आहे. अशा परिस्थितीत घरांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. मात्र याच दरम्यान तज्ज्ञांनी चिनी नववर्षानिमित्त इशारा दिला आहे. ते म्हणतात की लोक मोठ्या संख्येने प्रवास करतील, ज्यामुळे प्रकरणे वाढतील आणि मृत्यूची संख्या देखील जास्त असेल.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन