शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : परिस्थिती बिकट! चीनमध्ये औषधांचा दुष्काळ, किमतीत मोठी वाढ; दुकानांसमोर लांबच्या लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 5:51 PM

1 / 10
कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी चीनने निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली आहे. संपूर्ण चीनमध्ये वैद्यकीय पुरवठा ठप्प झाला आहे. औषधांच्या दुकानांसमोर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ही दुकाने लोकांच्या गरजाही पूर्ण करू शकत नाहीत.
2 / 10
चीनमध्ये अशा स्थितीत लोकांमध्ये संतापाची नवी लाट पाहायला मिळत आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की लोकांना औषधे आणि इतर वैद्यकीय उपकरणांसाठी भटकावं लागत आहे. जिथे माल मिळतो तिथे किंमत ही सामान्य किमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे.
3 / 10
ही उणीव दूर करण्यासाठी कोविड निर्बंध शिथिल करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तथापि, या शिथिलतेमुळे देशात कोविड संसर्गाचा पुन्हा प्रसार होण्याची भीती सरकारला वाटत आहे. शुक्रवारी चीनमध्ये कोरोनाचे 13,585 नवीन रुग्ण आढळले. बीजिंगमध्ये कोविड चाचणीची फारशी गरज नसल्याचे कम्युनिस्ट पक्षाने म्हटले आहे.
4 / 10
स्थानिक प्रशासनाने सौम्य किंवा कोणतीही लक्षणे नसलेल्या लोकांना होम क्वारंटाइन करण्याची परवानगी दिली आहे. लोक आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पूर्वीपेक्षा सहजतेने जात आहेत. अशा स्थितीत आता औषधांचा तुटवडा दूर करून आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर सरकारचे लक्ष आहे.
5 / 10
चीनचा दावा आहे की, लवकरच पुरवठा लाइनमधील समस्या दूर होईल. त्यामुळे लोकांच्या अडचणी कमी होऊन औषधांची उपलब्धता वाढेल. जनतेनेही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. चीनच्या अनेक शहरांमधील फार्मसीमध्ये लांब रांगा लागलेल्या लोकांना कफ सिरप, फ्लूचे औषध आणि मास्क खरेदी करायचे आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
6 / 10
चीनमध्ये लोकांच्या संतापाचा उद्रेक झाल्यामुळे अखेर सरकार जनतेसमोर झुकलं आहे. झिरो कोविड पॉलिसीत मोठा बदल केला आहे. बीजिंगमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये कोणतीही घट झालेली नाही, परंतु सार्वजनिक वाहतूक, बार-रेस्टॉरंट्स, शाळा, इंटरनेट कॅफे, इनडोअर गेमिंग स्टेडियम इत्यादी हळूहळू सुरू होत आहेत.
7 / 10
गेल्या आठवड्यापासून चीनमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांनंतर, चीन सरकार हळूहळू स्वतःहून कठोरपणे आपली झिरो कोविड पॉलिसी संपवत आहे. जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली तर त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये जाण्याची गरज नाही. त्याला फक्त घरीच क्वारंटाईन केले जाऊ शकते.
8 / 10
चीन सरकारच्या नव्या घोषणेनुसार, शॉपिंग मॉल्स, सुपरमार्केट, निवासी संकुलांमध्ये प्रवेश करण्यासाठी लोकांना कोरोना रिपोर्टची गरज नाही. चीनची राजधानी बीजिंगने मंगळवारी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या झिरो कोविड पॉलिसीला विरोध केल्यानंतर दोन वर्षांत प्रथमच कोरोना व्हायरस चाचणी आवश्यकतांचे नियम शिथिल करण्यात आले आहेत.
9 / 10
बीजिंगच्या रहिवाशांनी रेस्टॉरंट, शाळा, बार, इंटरनेट कॅफे, इनडोअर गेमिंग स्टेडियम, नर्सिंग होम, कल्याण सुविधा, रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांमध्ये प्रवेश करण्यासाठी 48 तासांच्या आत कोविड-19 चा रिपोर्ट दाखवावा लागेल. ज्यामध्ये ते संक्रमित नाहीत याचा उल्लेख असायला हवा. बीजिंग शहरात कोविड-19 ची मोठ्या प्रमाणात प्रकरणे समोर येत आहेत.
10 / 10
बीजिंगच्या रहिवाशांनी रेस्टॉरंट, शाळा, बार, इंटरनेट कॅफे, इनडोअर गेमिंग स्टेडियम, नर्सिंग होम, कल्याण सुविधा, रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांमध्ये प्रवेश करण्यासाठी 48 तासांच्या आत कोविड-19 चा रिपोर्ट दाखवावा लागेल. ज्यामध्ये ते संक्रमित नाहीत याचा उल्लेख असायला हवा. बीजिंग शहरात कोविड-19 ची मोठ्या प्रमाणात प्रकरणे समोर येत आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन