शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चिंताजनक! वुहानमध्ये कोरोनाचा कहर; 3 वर्षांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन, 8 लाख लोक घरात कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 2:24 PM

1 / 6
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. लाखो लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. याच दरम्यान आता चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. जिथे कोरोनाचा उगम झाला त्या वुहान शहरापासून उत्तर पश्चिमेकडील अनेक शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
2 / 6
कोरोनामुळे परिसरातील इमारती सील करण्यात आल्या आहेत. चीनमध्ये सलग तीन दिवसांपासून कोरोनाचे एक हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा उगम हा चीनमधील वुहानमध्ये झाला होता. वुहानमध्ये पहिला रुग्ण सापडला होता. 2019 मध्ये तिथे सर्वात पहिलं लॉकडाऊन लावण्यात आलं होतं.
3 / 6
आता दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा वुहानमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आह. या आठवड्यात वुहानमध्ये 20 ते 25 नवीन करोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 14 दिवसांत वुहानमध्ये कोरोनाचे 240 रुग्ण सापडले आहेत. स्थानिक प्रशासनाने एका जिल्ह्यात आठ लाखांहून अधिक लोकांना 30 ऑक्टोबरपर्यंत घरातच थांबण्याचे आदेश दिले आहेत.
4 / 6
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि पोस्टनुसार, वुहानमध्ये पॉर्कच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ ही पॉर्कचं मांस वितरीत करणाऱ्या स्थानिकांकडून होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. चीनमधील ग्वांगझोउ आणि त्याची राजधानी गुआंग्डोंगमधीलही काही परिसर सील करण्यात आले आहेत.
5 / 6
दातोंगसह चीनमधील अन्य मोठ्या शहरातील सरकारनेही कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कठोर पावलं उचलली आहेत. बिजिंगमध्ये बुधवारी युनिवर्सल रिसॉर्ट थीम पार्कमध्ये कोरोना रुग्ण सापडल्याने ते आता बंद करण्यात आले होते.
6 / 6
चीनमधील कोरोनाबाबत झिरो कोविड पॉलिसी लागू करण्यात आली आहे. या पॉलिसीअंतर्गंत एखाद्या परिसरात कोरोनाचा एक जरी रुग्ण आढळला तरी संपूर्ण भागात लॉकडाऊन करण्यात येतं. दरम्यान, चीनच्या या पॉलिसीवरुन अनेकदा टीकाही करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन