शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : "30 वर्षांत असा विद्ध्ंवस पाहिला नाही"; कोरोनामुळे भीषण परिस्थिती, स्मशानात आठवड्याचं वेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 4:44 PM

1 / 12
कोरोनाने पुन्हा एकदा संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं आहे. रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने आरोग्य सेवेवर मोठी दबाब येत आहे. रुग्णालयात बेडच शिल्लक नाही तर घरी उपचार सुरू असलेल्या लोकांना औषधं देखील मिळत नाहीत. चीन सध्या अत्यंत भीषण परिस्थितीचा सामना करत आहे.
2 / 12
ज्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी साधारण एक आठवड्याचं वेटिंग पाहायला मिळत आहे. चीनच्या अनेक शहरांत स्मशानाबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर दुसरकडे चीन नियम शिथील करून सर्व सामान्य असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.
3 / 12
झिरो कोविड पॉलिसी हटवल्यापासून चीनमध्ये दररोज परिस्थिती बिघडत चालली आहे. चीनमध्ये अत्यंत मोठ्या संख्येने लोक संक्रमित होत आहेत. मीडिया रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की, चीनमध्ये रोज लाखो-करोडो लोकांना कोरोनाची लागण होत आहे. मृतांचा आकडाही मोठा आहे.
4 / 12
चीनने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा नियम देखील आता बंद केला आहे. तसेच मंगळवारी फक्त तीन लोकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. पण रुग्णालयातील आणि स्मशानातील व्हिडीओ हे चीनची पोलखोल करत असून सत्य समोर आणत आहेत.
5 / 12
एका रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने सांगितलं की, मी गेल्या 30 वर्षांपासून येथे काम करत आहे. पण आतापर्यंत असा विद्ध्ंवस पाहिला नाही. रुग्णालयाच्या आत-बाहेर रांगा आहेत. सर्वांनाच ऑक्सिजन दिला जात आहे. अनेकांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयातील कोरोना औषधांचा स्टॉक संपला आहे.
6 / 12
चेंगदूच्या सर्वात मोठ्या फ्यूनरल होमचं पार्किंग देखील फुल आहे. सतत अंत्यसंस्कार केले जात आहेत. एका कर्मचाऱ्याने सांगितलं की आम्ही एका दिवसात 200 जणांवर अंत्यसंस्कार करत आहेत. इतके व्यस्त आहोत की जेवायला देखील वेळ नाही. अनेकांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं सांगितलं आहे.
7 / 12
कोरोनामुळे मृत्यू झालेल्याच्या अंत्यसंस्कारासाठी स्लॉट बुक झाले आहेत. तीन जानेवारीपर्यंतच बुकिंग झालं आहे. चीन संक्रमित आणि मृत्यूची संख्या लपवण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहे. दरम्यान, चीनमधून काही व्हिडीओ समोर आले आहेत जे या दाव्यांचे समर्थन करत आहेत.
8 / 12
ह्यूमन राइट एक्टिविस्ट जेनिफर झेंग यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे चीनमधील गंभीर परिस्थिती पाहायला मिळते. जेनिफरने लिहिले की, '24 डिसेंबर शांघाई सिटी हॉस्पिटल...' व्हिडिओंमध्ये हॉस्पिटलच्या मजल्यावर मृतदेहांचा ढीग दिसत आहे.
9 / 12
जेनिफरने यासोबतच आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे जो एंसन शहरातील आहे. यामध्ये फ्यूनरल होम पूर्णपणे मृतदेहांच्या ढिगाऱ्याने भरलेले दिसत आहे. कोरोनामुळे मृतांचा आकडा एवढा आहे की, फ्यूनरल होमच्या पार्किंगमध्ये मृतदेह ठेवण्यात येत आहेत. परिस्थिती इतकी बिघडली आहे की मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक किलोमीटरची लाईन लागली आहे.
10 / 12
शांघाई शहरातील स्मशानभूमीत भरती सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकांना सांगितले जात आहे की जे लोक मृतदेह उचलू शकतात ते अर्ज करू शकतात. हे आकडे जगासमोर येऊ नयेत यासाठी चीन आता एक नवीन युक्ती वापरत आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार, रुग्णालयातून मृतदेह घेण्यासाठी येणाऱ्यांना एका फॉर्मवर सही करायला लावली जात आहे.
11 / 12
मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचे स्पष्ट शब्दात लिहिले आहे. बीजिंगच्या फ्युनरल होमला दिलेल्या नोटीसनुसार, कोणताही कर्मचारी मीडिया संस्थेशी बोलणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. यासोबतच कोणत्याही प्रकारचा डेटा शेअर करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
12 / 12
चीनमध्ये गेल्या 20 दिवसांत 25 कोटी लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सरकारी कागदपत्र लीक झाल्यानंतर हा खुलासा झाला आहे. चीनने 8 जानेवारीपासून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईनमधून सूट जाहीर केली आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय सीमाही खुली करण्याची चर्चा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन