शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिलासादायक : जगातल्या 'या' पहिल्या शहरात 'हर्ड इम्यूनिटी'नं होतोय कोरोनाचा खात्मा! पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 3:28 PM

1 / 8
जेथे कोरोना व्हायरने सर्वप्रथम आणि सर्वाधिक थैमान घातले, अशा देशांच्या यादीत इटलीचा समावेश होतो. मात्र आता इटलीतून दिलासादायक बातमी येत आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इटलीतील बर्गामो शहर आता हर्ड इम्यूनिटीच्या नजिक पोहोचताना दिसत आहे.
2 / 8
जेथे कोरोना व्हायरने सर्वप्रथम आणि सर्वाधिक थैमान घातले, अशा देशांच्या यादीत इटलीचा समावेश होतो. मात्र आता इटलीतून दिलासादायक बातमी येत आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इटलीतील बर्गामो शहर आता हर्ड इम्यूनिटीच्या नजिक पोहोचताना दिसत आहे.
3 / 8
जगातील अनेक तज्ज्ञमंडळीचे असे मत आहे, की जवळपास 60 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली, तर माणसात हर्ड इम्यूनिटी तयार होऊ शकते. असे झाल्यास कोरोना व्हायरसची चैन तुटेल आणि नवे लोक क्वचितच संक्रमित होतील.
4 / 8
बर्गामोतील आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की अँटीबॉडी तपासण्यासाठी रँडम सॅम्पल घेण्यात आले होते. या अधिकाऱ्यांनी हे सॅम्पल फार व्यापक असल्याचे सांगितले. आणि रिझल्ट एक विश्वासार्ह संकेत असल्याचे म्हटले आहे.
5 / 8
मात्र, आधिकृतपणे हे स्पष्ट झालेले नाही, की कोरोनाची अँटीबॉडी असलेले लोक किती वेळ व्हायरसचा प्रतिकार करू शकतात. यासंदर्भात शोध सुरू आहे आणि लवकरच काही माहिती समोर येऊ शकते.
6 / 8
बर्गामो शहरात पहिला करोना रुग्ण फेब्रुवारी महिन्यात समोर आला होता. यानंतर शहरात कडक लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. इटलीत गेल्या आठवड्यातच लॉकडाउनमधून काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.
7 / 8
कोरोना व्हायरसने इटलीत आतापर्यंत तब्बल 34 हजारहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. इटलीत आतापर्यंत तब्बल 2.35 लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
8 / 8
इटलीची लोकसंख्या केवळ 6 कोटींच्या जवळपास आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याItalyइटली