शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : कोरोनाचा हाहाकार! ना उपचार, ना स्मशानात जागा... मृतांच्या आकड्यांवरही चीनने लावला सेन्सर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 3:37 PM

1 / 11
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. चीनमध्ये अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या आकडा हा सातत्याने वाढत आहे. चीन सरकार सत्य लपवण्याचा प्रयत्न करत असलं. तरी सोशल मीडियावर चीनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होत आहेत. यामध्ये तेथील भयंकर परिस्थितीचा अंदाज येतो.
2 / 11
चीनचं सरकार आकडे लपवण्यासाठी विविध गोष्टींचा अवलंब करत आहे. चीनने रविवारपासून नॅशनल हेल्थ कमिशन कोरोनाशी संबंधित आकडे जारी करणार नाही. तसेच कोरोना मृतांच्या रिपोर्टबाबत असलेल्या गाईडलाईन्समध्ये देखील आता बदल करण्यात आले आहेत.
3 / 11
चीनमध्ये रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढत आहे. केसेस इतक्या वाढल्या आहेत की लोकांना उपचार मिळू शकत नाहीत. डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफची देखील मोठी कमतरता आहे. चीनमध्ये मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी संक्रमित झाले आहेत. त्यामुळे कामावर येऊ शकत नाहीत.
4 / 11
स्मशानात देखील गंभीर परिस्थिती आहे. स्मशानाबाहेर लोकांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहे. कुटुंबीय अनेक तास अंत्यसंस्कारासाठी वाट पाहत असून याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. चीनमधील बिघडलेली परिस्थिती आणि माहिती लपवण्याचा आरोप असताना आता चीनने आकडे जारी न करण्याचा निर्णय घेतला.
5 / 11
कमिशनने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाशी संबंधित आकडे चायनीज सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या वतीन जारी केले जातील. चीनच्या झेजियांगमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रोज दहा लाख केस मिळत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे झेजियांगमध्ये रोज लाखो केस येत असताना आता कोरोना मृतांचा रेकॉर्डच नाही. लोक घरातून बाहेर पडत नाहीत.
6 / 11
चीनमध्ये असे तीन प्रांत आहेत, ज्यामध्ये दोन कोटींहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये सिचुआनस हेनाना आणि हुबेई यांचा समावेश आहे. याशिवाय हुनान, हेबेई, ग्वांगडॉन्ग, बीजिंग, अनहुई आणि शॅनडॉन्गमध्ये देखील रुग्णांच्या आकडा मोठा आहे. परिस्थिती गंभीर आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.
7 / 11
चीनमधील कम्युनिस्ट पक्षावर लक्ष ठेवणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांचे मृतदेह दिसत आहेत. हा व्हिडीओ एका मशिदीचा आहे. अंत्यसंस्कारासाठीचा प्रतिक्षा कालावधी मोठा असल्याने बीजिंगमधील गोदामांमध्ये मृतदेह ठेवण्यात येत आहेत.
8 / 11
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे झेंग यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. मात्र, ही अफवा असून याला दुजोरा मिळालेला नाही. युक्वानिंग उपजिल्हा येथील एका गोदामात 15 हजार मृतदेह ठेवण्यात आले आहेत, असेही झेंग यांनी सांगितले.
9 / 11
ऑक्सिजनची कमतरता हीदेखील चीनमधील एक मोठी समस्या आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढत असल्याचे सांगण्यात येते. हा आकडा दहा लाखांवर जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, येथे रक्ताचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. चीनच्या लसीची गुणवत्ताही चांगली नाही. लसीकरणाचे प्रमाणही कमी आहे.
10 / 11
तिथे ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मृत्यूची शक्यता अधिक आहे. त्या तुलनेत आपल्या देशात 65 वर्षांवरील लोकांची संख्या 6 टक्के आहे. आज चीनमध्ये जी परिस्थिती आहे, त्यामुळे जगात संकट निर्माण होईल, असे मला वाटत नाही, असे आयसीएमआरचे माजी प्रमुख रमण गंगाखेडकर यांनी दिला आहे.
11 / 11
चीनमधील बीएफ.7 प्रमाणेच अमेरिकेत एक्सबीबीची प्रकरणे वाढत आहेत. हा देखील ओमायक्रॉनचा उपप्रकार आहे. अमेरिकन सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, या आठवड्यात देशात नोंदवलेल्या प्रकरणांपैकी 18.3% प्रकरणे एक्सबीबी प्रकारातील आहेत. गेल्या आठवड्यात आकडा 11.2% होता. सिंगापूरमध्येही या प्रकाराची प्रकरणे आढळून येत आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन