शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : 7 दिवसांत 30 लाख रुग्ण, न्यू ईयर सेलिब्रेशननंतर जपान-अमेरिकेसह 'या' देशांत कोरोनाचा विस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 10:19 AM

1 / 14
चीनसह जगभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशननंतर जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि ब्राझीलमध्येही कोरोनाचा विस्फोट झाला आहे. गेल्या 7 दिवसांत जगभरात कोरोनाचे 30 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, महामारीमुळे 9847 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
2 / 14
फक्त जपानमध्ये 7 दिवसांत 2188 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाच्या आकडेवारीवर नजर ठेवणारी संस्था वर्ल्डोमीटर्सच्या मते, गेल्या 7 दिवसांत जगात कोरोनाचे 3,044,999 रुग्ण आढळले आहेत. तर 9,847 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यादरम्यान 2,545,786 लोक बरेही झाले आहेत.
3 / 14
जपानमध्ये कोरोनाची सर्वाधिक लागण झाली आहे. गेल्या एका आठवड्यात येथे 10 लाख प्रकरणे आढळून आली आहेत. त्याच वेळी 2188 लोकांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण कोरियामध्येही प्रकरणे वेगाने वाढत आहेत. येथे 457,745 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याच वेळी, 429 लोकांचा मृत्यू झाला आहे.
4 / 14
अमेरिकेत 7 दिवसांत 212,026 प्रकरणे आढळून आली आहेत. तर गेल्या 7 दिवसात 1239 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. ब्राझीलमध्ये 7 दिवसांत 185,947 प्रकरणे आढळून आली आहेत. तर 1015 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
5 / 14
चीनच्या शेजारच्या तैवानमध्ये 185947 प्रकरणे आढळून आली आहेत. या दरम्यान 174 लोकांचा मृत्यू झाला आहे. हाँगकाँगमध्ये 291 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 164182 प्रकरणे आढळून आली आहेत. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
6 / 14
जर्मनी (157,928), फ्रान्स (147,584), अर्जेंटिना (72,558), इटली (67,228) आणि ऑस्ट्रेलिया (46,439) मध्येही कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. जर्मनीमध्ये 7 दिवसांत 697 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये 808, इटलीमध्ये 430 आणि ऑस्ट्रेलियामध्ये 106 जणांचा मृत्यू झाला आहे.
7 / 14
चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसी मागे घेतल्यापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. चीनच्या आरोग्य व्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. गर्दीमुळे रुग्णालयांमध्ये बेडच शिल्लक नाहीत. कोरोनाची लागण होऊनही डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावर यावे लागत आहे.
8 / 14
एवढेच नाही तर हजारो लोक कोरोनामुळे आपला जीव गमावत आहेत. फ्यूनरल होममध्ये अंत्यसंस्कारासाठी वेटिंग आहे. याच दरम्यान, यूकेस्थित आरोग्य डेटा फर्मच्या अहवालात चीनमध्ये दररोज सुमारे 9,000 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
9 / 14
फर्मच्या अहवालानुसार, डिसेंबरमध्ये चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची एकूण संख्या एक लाखाच्या जवळपास असू शकते. एवढेच नाही तर चीनमध्ये आतापर्यंत 18.6 कोटी केसेस आढळल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. त्याचबरोबर जानेवारीच्या मध्यापर्यंत परिस्थिती आणखी बिघडण्याची चिन्हे आहेत.
10 / 14
दररोज 37 लाख केसेस येतील असा अंदाज आहे. एवढेच नाही तर 23 जानेवारीपर्यंत चीनमध्ये 5.84 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
11 / 14
चीनमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून कोरोनाने थैमान घातले आहे. वेगाने वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येने जगाचं टेन्शन वाढवलं आहे. धडकी भरवणारं चित्र सध्या चीनमध्ये पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने रुग्णालयं खचाखच भरली आहेत.
12 / 14
एकही बेड उपलब्ध नसल्याने जमिनीवर रुग्णांना ठेवून उपचार केले जात आहेत. तसेच मृतांचा आकडा वाढल्याने शवागृहही भरली आहे. मृतदेहांचे ढीग पाहायला मिळत आहेत. अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा पार कोलमडली आहे. औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
13 / 14
कोरोना वेगाने पसरताच चीन जुनीच चूक करताना दिसत आहे. पुन्हा एकदा आकडे लपवत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचं भीषण संकट असताना अशाप्रकारे आकडे लपवणं हे अत्यंत घातक ठरू शकतं. त्यामुळे कोरोनाच्या गंभीरतेचा अंदाज घेणं अवघड होईल आणि त्याचा परिणाम भोगावा लागेल.
14 / 14
चीनने यावेळी कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा लपवण्यासाठी आता नवीन पद्धत शोधून काढली आहे. आपली वेगळी गाईडलाईन तयार केली आहे. श्वासासंबंधीत आजाराने रुग्णांचा मृत्यू झाला तरच कोरोनाने मृत्यू झाल्याचं मानलं जाईल असं त्यामध्ये म्हटलं आहे. तसेच इतर गोष्टींचा त्यामध्ये समावेश नाही.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनAmericaअमेरिकाJapanजपानBrazilब्राझील