Corona Virus Man takes 10 corona vaccine shots in single day in new zealand
Corona Vaccine : धक्कादायक! तरुणानं 24 तासांत तब्बल 10 वेळा घेतली कोरोना लस अन् मग...! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 12:39 PM1 / 9न्यूझीलंडमध्ये एका व्यक्तीने 24 तासांत तब्बल 10 वेळा कोरोना लसीचा डोस घेतला. यानंतर आता आरोग्य मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. यासाठी या व्यक्तीने एका दिवसांत अनेक लसीकरण केंद्रांना भेट दिली आणि प्रत्येक डोससाठी त्याला पैसे दिले गेले, असे मानले जात आहे.2 / 9यासंदर्भात बोलताना, न्यूझीलंडमधील आरोग्य मंत्रालयाच्या कोरोना लस आणि लसीकरण कार्यक्रमाचे ग्रुप मॅनेजर अॅस्ट्रिड कॉर्निफ यांनी सांगितले की, 'मंत्रालयाला याची माहिती देण्यात आली असून हा प्रकार आम्ही अत्यंत गाभीर्याने घेतला आहे.3 / 9ते म्हणाले, या स्थितीसंदर्भात आम्ही अत्यंत चिंतित आहोत आणि संबंधित संस्थांसोबत काम करत आहोत. जर एकापेक्षा अधिक डोस कुण्या व्यक्तने घेतले असतील, तर त्याने तत्काळ डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घ्यायला हवा. तसेच, ही घटना नेमकी कुठे घडली याची पुष्टी मंत्रालय करणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 4 / 9या प्रकरणावर बोलताना, लसीकरण सल्लागार केंद्राच्या वैद्यकीय संचालक आणि ऑकलंड विद्यापीठाच्या प्रोफेसर निक्की टर्नर यांनी म्हटले आहे, की एका दिवसात लसीचे एवढे डोस घेण्याचा कोणताही डेटा नाव्हता.5 / 9त्या म्हणाल्या, सध्या आपण जी लस वापरत आहोत, ती प्राथमिक माहितीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. ती मानवी शरीरात चांगल्या प्रकारे रोगप्रतिकारशक्ती निर्माण करून लोकांना सुरक्षित ठेवण्याचे काम करते. याशिवाय, लसीचे अधिक डोस घेण्याचे दुष्परिणामही अधिक आहेत, हे आम्हाला माहीत आहे, असेही त्या म्हणाल्या.6 / 9निक्की टर्नर म्हणाल्या, 'हे निश्चितपणे योग्य नाही, या लसीचे अधिक डोस घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीवर याचा कसा दुष्परिणाम होऊ शकतो, यासंदर्भात आमच्याकडे कसल्याही प्रकारची माहिती नाही. हे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही.7 / 9एका अहवालात याआधीच इशारा देण्यात आला होता, की लोक दुसऱ्यांच्या ओळखपत्राचा वापर करून अनेक वेळा कोरोना लसीचा डोस घेऊ शकतात. तेव्हा आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्ताने म्हटले होते, की कोरोना लस आणि लसीकरण कार्यक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात पोलिसांनाही सूचना दिली होती. (सर्व फोटो - सांकेतिक)8 / 9एका अहवालात याआधीच इशारा देण्यात आला होता, की लोक दुसऱ्यांच्या ओळखपत्राचा वापर करून अनेक वेळा कोरोना लसीचा डोस घेऊ शकतात. तेव्हा आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्ताने म्हटले होते, की कोरोना लस आणि लसीकरण कार्यक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात पोलिसांनाही सूचना दिली होती. (सर्व फोटो - सांकेतिक)9 / 9एका अहवालात याआधीच इशारा देण्यात आला होता, की लोक दुसऱ्यांच्या ओळखपत्राचा वापर करून अनेक वेळा कोरोना लसीचा डोस घेऊ शकतात. तेव्हा आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्ताने म्हटले होते, की कोरोना लस आणि लसीकरण कार्यक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात पोलिसांनाही सूचना दिली होती. (सर्व फोटो - सांकेतिक) आणखी वाचा Subscribe to Notifications