शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : कोरोनाचा विस्फोट! चीनच्या 80 टक्के लोकसंख्येला संसर्ग; नव्या लाटेबाबत शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 11:55 AM

1 / 14
चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढल्याने भारत, जपान आणि अमेरिकेसारख्या देशांमध्येही नव्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, चिनी सरकारी शास्त्रज्ञ म्हणतात की देशातील 80% लोकांना संसर्ग झाला आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यांत संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता कमी आहे.
2 / 14
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे मुख्य एपिडेमियोलॉजिस्ट वू जुनाओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, लूनर न्यु ईयरच्या निमित्ताने लोकांचे येणे-जाणे सुरूच राहील. यामुळे कोरोना संसर्ग देखील वेगाने पसरेल, परंतु कोरोनाची नवीन लाट येण्याची शक्यता कमी आहे.
3 / 14
चिनी औषध निर्माता सिनोफार्मने सांगितले की त्यांची mRNA लस क्लिनिकल चाचण्यांसाठी मंजूर झाली आहे. कंपनीने म्हटले आहे की हे ओमायक्रॉन व्हेरिएंटशी लढण्यासाठी उपयुक्त ठरेल. कंपनीने शांघायमध्ये एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर देखील तयार केले आहे. जिथे दरवर्षी या लसीचे 2 बिलियन डोस तयार केले जातील.
4 / 14
जपान टुडेच्या रिपोर्टनुसार, शनिवारी (21 जानेवारी) तेथे 78 हजार 954 प्रकरणे नोंदवण्यात आली. राजधानी टोकियोमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 6607 झाली आहे. मृतांचा आकडा 398 वर पोहोचला आहे. 683 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
5 / 14
जपान आणि दक्षिण कोरियाच्या नागरिकांवर बंदी घातल्यानंतर आता चीनमधील काही लोकांना देशात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी व्हिसाचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. कोरोनामुळे अनेक प्रगत देश देखील हतबल झाले असून गंभीर परिस्थिती आहे.
6 / 14
कोरोना वर्ल्डोमीटरनुसार, जगात आतापर्यंत 67 कोटी 29 लाख 82 हजार 75 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 11 जानेवारी 2020 रोजी चीनमधील वुहान येथे एका 61 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. जगातील कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू होता. यानंतर मृत्यूच्या घटना वाढू लागल्य़ा. आतापर्यंत 67 लाख 42 हजार 978 जणांचा मृत्यू झाला आहे.
7 / 14
स्वीडन, जर्मनी, मलेशिया, कतार, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मोरोक्को, फ्रान्स, यूके, स्पेन, अमेरिका, जपान, इस्रायल, भारत, इटली आणि दक्षिण कोरियाने चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. येथे चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह कोरोना रिपोर्ट दाखवावा लागेल.
8 / 14
मोरोक्कोने आधीच चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. तैवानने चीनमधून येणाऱ्यांसाठीही कोविड चाचणी अनिवार्य केली आहे. पाकिस्तान आणि फिलिपाइन्सही नजर ठेवत आहेत. थायलंड आणि न्यूझीलंडने कोणतेही निर्बंध लादण्यास नकार दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
9 / 14
चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान, कोरोनामुळे येथे दररोज 36 हजार मृत्यू होण्याची शक्यता आहे. कारण लोक नववर्ष साजरं करण्यासाठी आपल्या घरी जाणार आहेत. झिरो कोविड पॉलिसी रद्द केल्यानंतर देश सध्या विनाशाच्या मध्यभागी असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
10 / 14
चीनने केवळ हॉस्पिटलमधील मृत्यूंचा विचार केला आहे. अशा परिस्थितीत घरांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. मात्र याच दरम्यान तज्ज्ञांनी चिनी नववर्षानिमित्त इशारा दिला आहे. ते म्हणतात की लोक मोठ्या संख्येने प्रवास करतील, ज्यामुळे प्रकरणे वाढतील आणि मृत्यूची संख्या देखील जास्त असेल.
11 / 14
एअरफिनिटी या जागतिक आरोग्य गुप्तचर सेवेचा अंदाज आहे की, 26 जानेवारीपर्यंत दररोज 36,000 मृत्यू होऊ शकतात. विश्लेषकांचा असाही अंदाज आहे की 27 जानेवारीपर्यंत दररोज 6.2 कोटी संक्रमित होऊ शकतात.
12 / 14
प्रोफेसर मिन्क्सिन पेई यांनी चीन मृतांची संख्या लपविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल असं म्हटलं आहे. निक्केई आशियाच्या अहवालानुसार, ते म्हणाले, 'झिरो कोविड पॉलिसी हटवण्यात आलेल्या भागात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सरकारला ते लपवण्यासाठी भाग पाडले जात आहे.
13 / 14
रोज नवनवीन प्रकरणे समोर येत असताना देशातून श्रीमंतांचे पलायन सुरू आहे. चीनमधील श्रीमंत लोक इतर देशांमध्ये जाण्याचा विचार करत आहेत. कारण चीनमधील देशांतर्गत राजकारण गुंतागुंतीचे झाले आहे.
14 / 14
परकीय गुंतवणुकीद्वारे आपली संपत्ती बाहेर काढण्याऐवजी नागरिक स्वतःच इतर देशांमध्ये स्थायिक होण्याचे मार्ग शोधत आहेत. श्रीमंत लोक जपान, सिंगापूर आणि काही दक्षिण पूर्व आशियाई देशांना पसंतीचे ठिकाण म्हणून पाहत आहेत. कोरोना महामारीच्या काळात चीन सरकारने त्याच्या खासगी मालमत्तेवर केलेल्या आक्रमणामुळे ते त्रस्त आहेत
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनJapanजपानCorona vaccineकोरोनाची लस