शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शहर लॉक डाऊन करणं म्हणजे नक्की काय?; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 4:47 PM

1 / 14
कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातल्या अनेक शहरांमध्ये लॉक डाऊनसारखी परिस्थिती आहे. अनेक जण स्वतःच्या घरातच नजरकैद झाले आहेत.
2 / 14
भारतातच नव्हे, तर चीन, इटली, स्पेन, लंडन आदी देशांत लॉक डाऊनसारखी स्थिती आहे. पण लॉक डाऊन म्हणजे नेमकं काय असतं, हा प्रश्न अनेकांना सतावत असतो.
3 / 14
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणताही ठोस उपाय नाही. यापासून बचावासाठी सरकार लॉक डाऊनसारखे हातखंडे वापरत असतं. दिल्ली सरकारनं सिनेमा हॉल, स्कूल आणि मॉल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी दिल्लीतही मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती.
4 / 14
वस्तुतः लॉक डाउन ही आपत्कालीन प्रणाली आहे, जी एखाद्या साथीच्या किंवा आपत्तीच्या वेळी अधिकृतपणे शहरात लागू केली जाते. लॉक डाऊनच्या बाबतीत त्या भागातील लोकांना घरे सोडण्याची परवानगी नसते.
5 / 14
त्यांना घरातच नजरकैद व्हावे लागते. त्यांना केवळ औषध किंवा अन्नधान्य अशा आवश्यक गोष्टींसाठी बाहेर येण्याची परवानगी आहे.
6 / 14
समाजात किंवा शहरात राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या आरोग्यापासून किंवा इतर जोखमीपासून संरक्षित करण्यासाठी लॉक डाऊन प्रणाली अंमलात आणली गेली आहे.
7 / 14
आजकाल कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच देशांत त्याचा अवलंब केला जात आहे. परंतु आताच याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही.
8 / 14
सरकारऐवजी यावेळी लोक स्वत: अर्ज करत आहेत. उदाहरणार्थ, इटलीच्या बर्‍याच भागात लोक स्वत: च्या घरात नजरकैद झाले होते.
9 / 14
जेणेकरून कोरोना संसर्ग त्यांच्यापर्यंत पोहोचू नये. त्याच वेळी ज्या ठिकाणी संक्रमित व्यक्ती अधिक आढळतात, अशा ठिकाणी लॉक डाऊन लागू केले जाते.
10 / 14
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर चीन, डेन्मार्क, लंडन, अमेरिका, अल साल्वाडोर, फ्रान्स, आयर्लंड, इटली, न्यूझीलंड, पोलंड आणि स्पेन या देशांमध्ये लॉकडाउनसारखी परिस्थिती आहे.
11 / 14
कोरोना विषाणूच्या संसर्गाची नोंद सर्वप्रथम चीनमध्ये झाली होती, म्हणून तिथे प्रथम लॉकडाऊन झाले. तेथील सरकारने लोकांना एक प्रकारे घरात बंद राहण्याचे सांगितले.
12 / 14
त्याचप्रमाणे जेव्हा इटलीची परिस्थिती चिंताजनक बनली, तेव्हा हजारो संक्रमित लोक तिथे येऊ लागले. अशा परिस्थितीत इटलीच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देशाला टाळे ठोकले. मग इटलीच्या पावलावर स्पेन आणि फ्रान्सनेही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पाऊल उचलले आहे.
13 / 14
सर्वात पहिल्यांदा अमेरिकेतील 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आलं होतं. त्यावेळी अमेरिकन सरकारने तीन दिवस लॉकडाउन केले होते. डिसेंबर 2005मध्ये न्यू साउथ वेल्स पोलीस दलाने दंगल रोखण्यासाठी लॉक डाऊन केले होते.
14 / 14
19 एप्रिल, 2013ला बोस्टन शहरात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आले होते. नोव्हेंबर 2015 मध्ये पॅरिस हल्ल्यानंतर संशयितांना पकडण्यासाठी संपूर्ण ब्रुसेल्स शहराला 2015मध्ये लॉक डाऊन करण्यात आले होते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या