CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्ट नसल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 21:20 IST
1 / 17रशियाने दुसरी कोरोना लस तयार केल्याचा दावा केला आहे. पहिल्या लशीत जे साईड इफेक्ट दिसून आले होते, तसे कुठलेही साइड इफेक्ट्स या लशीत नाहीत, असेही सांगण्यात येत आहे. 2 / 17यापूर्वी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी Sputnik V नावाने कोरोना लस तयार केल्याची घोषणा केली होती. मात्र, या लशीचे अनेक साइड इफेक्ट दिसून आले होते. 3 / 17Sputnik V या लशीच्या घोषणेनंतर जगभरातून रशियावर टीकेची प्रचंड झोडही उठली होती.4 / 17रशियाने या नव्या लशीला EpiVacCorona असे नाव दिले आहे. रशियाची ही लसही संशयाच्या भोवऱ्यात अडकू शकते.5 / 17यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते, की कोरोना लस 2021 पूर्वी येऊ शकणार नाही. 6 / 17रशिया EpiVacCorona लशीची निर्मिती सैबेरियातील सोव्हियत संघाच्या एका जुन्या टॉप सिक्रेट बॉयोलॉजिकल शस्त्र तयार करणाऱ्या प्लांटमध्ये करत आहे.7 / 17रशियन वैज्ञानिकांनी सांगितले, की या नव्या कोरोना लशीचे क्लिनिकल ट्रायल सप्टेंबरमध्ये पूर्ण होईल. ही लस आतापर्यंत 57 जणांना टोचण्यात आली असून त्यांच्या अद्याप कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट दिसून आलेले नाहीत. सर्वजण स्वस्थ आहेत.8 / 17या सर्वांना परीक्षणासाठी 23 दिवस रुग्णालयातं ठेवण्यात आले होते. इंटरफॅक्स या वृत्त संस्थेने सांगितल्याप्रमाणे 'सर्व स्वयंसेवकांची प्रकृती उत्तम आहे. अद्याप त्यांच्यात कसल्याही प्रकारचे साइड इफेक्ट दिसून आलेले नाहीत.'9 / 17स्वयंसेवकांना 14 ते 21 दिवसांच्या आत दुसऱ्यांदा EpiVacCorona ही नवी लस देण्यात आली. 10 / 17रशियाला आशा आहे, की या लशीचे ऑक्टोबरपर्यंत रजिस्ट्रेशन केले जाऊ शकेल आणि नोव्हेंबरमध्ये हिच्या उत्पादनाला सुरुवात होईल. 11 / 17व्हेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ व्हायरॉलॉजी अँड बॉयोटेक्नॉलॉजीने ही लस तयार केली आहे.12 / 17ही लॅब जगातील अशा दोन ठिकाणांपैकी एक आहे, जेथे कांजिण्याच्या व्हायरसला ठेवण्याची परवानगी आहे. दुसरे ठिकाण अमेरिकेत आहे.13 / 17रशियाने कोरोना लस तयार केल्याचा दावा केल्यापासून वादही सुरू झाला आहे. अमेरिकेपासून जर्मनीपर्यंत रशियन लस स्पुतनिक-व्ही (Sputnik-V) वर शंका उपस्थित केली जात आहे.14 / 17जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) रशियाकडे अनेक पुरावे मागितले आहे. तसेच अनेक वैज्ञानिकदेखील रशियाच्या स्पुतनिक-व्ही लशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.15 / 17तज्ज्ञांच्यामते, जोवर तिसऱ्या टप्प्यावरील डेटावर चर्चा होत नाही, लस सुरक्षित असल्याचे सांगितले जाऊ शकतनाही. 16 / 17यातच, 20 देशांकडून लशीसाठी मोठ्या ऑर्डर्सदेखील मिळाल्या असल्याचा दावा रशियाने केला आहे. 17 / 17भारत, अमेरिका, इग्लंड आणि चीन हे देशही करोनावरील लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. या देशांच्या लशींचेही तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण सुरू आहे.