शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVaccine News : भारतात होणार Sputnik V कोरोना लशीचे उत्पादन? रशिया करतोय अशी 'प्लॅनिंग'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 8:10 PM

1 / 7
कोरोना लशीच्या उत्पादनासाठी रशियाला भारताकडून मोठ्या आशा आहेत. रशियन कोरोना लशीला फंडिंग करणारी संस्था रशियन डायरेक्ट इंव्हेस्टमेंट फंडने (RDIF) म्हटले आहे, की आम्ही लशीच्या उत्पादनासाठी भारतासोबत भागीदारी करण्याचा प्रयत्न करत आहोत.
2 / 7
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, RDIF चे सीईओ किरील दमित्रीव म्हणाले, 'रशियन लस Sputnik V च्या उत्पादनासाठी भारताकडून आशा आहे. लशीचे उत्पादन एक महत्वाचा विषय आहे. सध्या, भारतासोबत भागीदारी होईल, अशी आम्हाला आशा वाटते.'
3 / 7
भारतात रशियन लशीचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. ही भागीदारी झाल्यास आम्ही लशीची होत असलेली मागणी पूर्ण करू शकू. हे सांगणेही आवश्यक आहे, असे किरील म्हणाले.
4 / 7
रशियन लशीच्या उत्पादनासाठी अनेक देश इच्छा व्यक्त करत आहेत. यात लॅटिन अमेरिका, आशिया आणि मध्य पूर्वेकडील देशांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्याने पूढे जाण्याची रशियाची इच्छा आहे, असेही किरील म्हणाले.
5 / 7
किरील म्हणाले, आम्ही केवळ रशियाच नाही, तर UAE, सौदी अरेबिया आणि कदाचित ब्राझील आणि भारतातही लशीचे क्लिनिकल ट्रायल करणार आहोत.
6 / 7
रशिया पाचहून अधिक देशांत लशीचे उत्पादन करण्याची योजना तयार करत आहे. लशीची मागणीही वाढत आहे, असेही किरील यांनी म्हटले आहे.
7 / 7
रशियाने तिसऱ्या टप्प्यावरील लशीचे परीक्षण सुरू करण्यापूर्वीच आपली लस यशस्वी असल्याची घोषणा केली होती. यामुळे रशियावर जगभरातून टीकेची झोड उठली होती. रशियाने म्हटले होते, की कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोकांना Sputnik V लशीचे दोन डोस घ्यावे लागतील.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrussiaरशियाmedicineऔषधंVladimir Putinव्लादिमीर पुतिनNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत