शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: कोरोनावरील लसीसाठी मृत्यूचा धोका पत्करण्यास तयार झालीय ही २२ वर्षीय शास्त्रज्ञ तरुणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 6:09 PM

1 / 7
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या जग एका गंभीर संकटाचा सामना करत आहे. जगभरात आतापर्यंत कोट्यवधी लोकांना या आजाराचा संसर्ग झाला असून, त्यात लाखो लोकांचा बळी गेला आहे.
2 / 7
मानव जातीसाठी मोठे संकट ठरत असलेल्या कोरोनावर लस शोधून काढण्यासाठी सध्या जगातील विविध देशात संशोधन सुरू असून, त्यातील काही लसींना अपेक्षित यशही मिळताना दिसत आहे. दरम्यान, कोरोनावरील लसीसाठी स्वत:चे प्राणही पणाला लावण्यास तयार असल्याचे विधान एका संशोधक तरुणीने केले आहे.
3 / 7
सोफी रोझ असे या २२ वर्षीय तरुणीचे नाव आहे. कोरोना विषाणूवरील संशोधन आणि लसीसाठी आपण स्वत:ला कोरोना संक्रमित करवून घेण्यात तयार आहोत, असे तिने म्हटले आहेत. कोरोनावरील लसीच्या संशोधनासाठी मी स्वत:च्या मृत्यूचा छोटासा धोका पत्करण्यास तयार असल्याचे तिने सांगितले.
4 / 7
कोरोनावरील लसीच्या संशोधानला वेग यावा यासाठी सोफी हिने 1DaySooner या नावाने एक मोहीम सुरू केली आहे. तसेच कोरोनावरील लस लवकरात लवकर यावी यासाठी ह्युमन चॅलेंज ट्रायल सुरू करण्यात यावे, असे आवाहन तिने विविध देशांना केले आहे. मानवी चाचणीदरम्यान, लस टोचून घेणाऱ्या स्वयंसेवकांना जाणूनबुजून कोरोना संक्रमित केले जाते.
5 / 7
स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदवीधर झालेल्या सोफी हिने सांगितले की जर कोरोनावर उपाय शोधण्याची शक्यता असेल तर मी त्यासाठी तयार आहे. ती म्हणाली की, मी माझ्या मित्राला किडनी दान करेन असा विचार मी एके दिवशी केला होता. मात्र आता मी विचार करतेय की जर मी कोरोनाविरोधातील मानवी चाचणीत सहभागी झाले तर माझ्यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचू शकतील.
6 / 7
सोफी पुढे म्हणाली की, जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच जर कोरोनावरील लस ही तरुणांवर प्रभावी आहे असे समोर आले तरी फायदाच होणार आहे. कारण त्यामुळे तरुण आरामात कामावर जाऊ शकतील आणि अर्थव्यवस्था बळकट होईल.
7 / 7
सोफी ही ऑक्सफर्ड विद्यापीठात क्लिनिकल कॅन्सर रिसर्चर म्हणून काम पाहत होती. मात्र मे महिन्यामध्ये 1DaySooner ही मोहीम सुरू करण्यापूर्वी तिने हे काम सोडले. आतापर्यंत 1DaySooner या मोहिमेमधून १५१ देशातील ३३ हजार स्वयंसेवकांनी मानवी चाचणीत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी केली आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यmedicineऔषधं