Coronavirus: चीनविरोधात जगातील ६२ देशांनी आखला ‘चक्रव्यूह’; कोरोनाला जबाबदार आढळल्यास... By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 11:59 AM
1 / 11 चीनच्या वुहान शहरातून कोरोना व्हायरसने जन्म घेतला त्यानंतर संपूर्ण जगावर कोरोनानं थैमान घातलं. कोरोनाबाबत सुरुवातीच्या काळात अनेक माहिती चीनने लपवल्याचा आरोप झाला तसेच अहवाल आलेत. त्यामुळे चीनमुळे हळूहळू कोरोना सर्वत्र पसरला 2 / 11 कोरोनाच्या संकटात जगातील १९० देशांपुढे मोठं आव्हान निर्माण केले आहे. जगभरात तीन लाखाहून अधिक लोक कोरोनाचे बळी गेले आहेत. जगातील अनेक देशांनी या संकटाला चीनला जबाबदार धरण्याची मागणी केली आहे. 3 / 11 चीनवर दबाव वाढत चालला आहे. तसेच चीनचा बचाव करणार्या जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेवरही निर्णय घेण्यात येणार आहे. भारतासह जगातील ६२ देशांनी कोरोनावर स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. जागतिक आरोग्य असेंब्लीमध्ये सोमवारी युरोपियन संघाने हा प्रस्ताव सादर केला जाईल. 4 / 11 कोविड १९ च्या संदर्भात डब्ल्यूएचओच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय आरोग्य प्रतिसादाच्या “निष्पक्ष, स्वतंत्र आणि सविस्तर तपासणीची” मागणी आहे. डब्ल्यूएचएमध्ये हा प्रस्ताव सहमतीने मंजूर केला जाऊ शकतो. 5 / 11 टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या सूत्रांच्या माहितीप्रमाणे या प्रस्तावावर चीन असो वा अमेरिका कोणीही विरोध केला नाही अशी भाषा वापरण्यात आली आहे. तथापि, हे दोन्ही देश या प्रस्तावाला पाठिंबा देणार्या ६२ देशांच्या यादीत नाहीत. 6 / 11 प्रस्तावात डब्ल्यूएचओच्या महासचिवांसोबत काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी व्हायरसचा मूळ स्त्रोत आणि तो माणसांमध्ये कसा पसरला याचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे. 7 / 11 भारत जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एक्झिक्युटिव्ह बोर्डाचा चेअरमन होत आहे. कोरोनाच्या मुद्यावर जगातील अनेक देश चीनवरोधात आवाज उठवत आहेत. मात्र भारताने अद्याप यावर ठोस भूमिका घेतली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी WHO च्या रिफॉर्म्सबाबत मत मांडले होते तर डोनाल्ड ट्रम्प यांनी WHO ला चीनचं बाहुलं म्हटलं होतं. 8 / 11 दरम्यान, युरोपीयन संघाच्या या प्रस्तावात चीन अथवा वुहान शहराचा उल्लेख नाही. त्याला चीनचा मित्र रशियाचा पाठिंबा देखील आहे. ऑस्ट्रेलियाशिवाय या प्रस्तावाला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये जपान, न्यूझीलंड, ब्राझील, दक्षिण कोरिया, युनायटेड किंगडम यांचाही समावेश आहे. 9 / 11 युरोपियन युनियनच्या या प्रस्तावाला भारताने पाठिंबा देणे अगदी योग्य आहे. कोरोना व्हायरस हा भारत आणि चीनमधील द्विपक्षीय मुद्दा नाही. चीन आणि आंतरराष्ट्रीय समुदाय यांच्यात ही बाब आहे. भविष्यात अशा साथीच्या आजारांपासून स्वत: चे रक्षण करण्याचा संपूर्ण जगाला अधिकार आहे. असा धोकादायक विषाणू अस्तित्वात कसा आला आणि नंतर मानवांमध्ये कसा पसरला हे जगाला जाणून घेण्याचा हक्क आहे. 10 / 11 अनेक देशांनी WHO आणि चीनबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोरोना साथीच्या प्रादुर्भावात आपला कोणताही सहभाग असल्याचे चीनने आतापर्यंत नाकारले आहे. पण चीनच या महामारीला जबाबदार आहे कळेल तेव्हा त्यांना परिणाम भोगावे लागतील असा इशारा अमेरिकेने दिला आहे. 11 / 11 कोरोनाप्रकरणी डब्ल्यूएचओची भूमिकादेखील संशयाच्या भोवऱ्यात आहे. चीनने कोरोनासंदर्भात जगाला वेळ असतानाच माहिती दिली नाही. तसेच, यासंदर्भात आवाज उठविणाऱ्यांचे आवाज दाबण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. तरीही डब्ल्यूएचओ चीनचेच गुणगान करत आहे, असे आरोप डब्ल्यूएचओवर होत आहेत. डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस एडहेनॉम यांच्यावरही चीनचा गुन्हा लपवण्याचा आरोप होत आहे आणि त्यांना राजीनामाही मागितला जात आहे. आणखी वाचा