coronavirus: after recovered from Corona, patient may have to deal with these problems in the future
coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 12:48 PM1 / 9कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या संपूर्ण जग त्रस्त झालेले आहे. कोरोनावर आतापर्यंत खात्रीशीर औषध मिळालेले नसले तरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही लक्षणीय आहे. मात्र कोरोनामुक्त झालेल्या अशा व्यक्तींना भविष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 2 / 9याबाबत कोरोनावर मात करणाऱ्या अनेक व्यक्तींनी आपले अनुभव कथन केले आहेत. आज आपण जाणून घेऊयात की कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात कुठल्या समस्यांचा सामना करावा लागतो ते. 3 / 9कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींमध्ये काही काळानंतर ज्या समस्या दिसून आल्या आहेत त्यामध्ये थकवा ही सामान्य समस्या आहे. तसेच डोकेदुखी, भीती वाटणे आणि स्नायूदुखी या समस्या जाणवतात. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना पुढच्या काही आठवड्यांपर्यंत या समस्या जाणवू शकतात. हा त्रास पुढच्या काही दिवसांपर्यंत जाणवू शकतो. 4 / 9कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर ज्या रुग्णांना व्हेंटिलेटर लावण्याची किंवा डायलिसिस करण्याची गरज भासली होती, अशा रुग्णांमध्ये कोरोनातून सावरल्यानंतरदेखील गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. ज्यांना निमोनिया झाला होता, अशां व्यक्तींच्या फुप्फुसांना नुकसान पोहोचू शकते. 5 / 9कोरोनाच्या संक्रमाणानंतर ज्यांची प्रकृती गंभीर बनली असेल किंवा ज्यांना व्हेंटिलेटर लावावा लागला असेल, अशा रुग्णांना कोरोनातून सावरल्यानंतर हृदयाच्या स्नायूंमध्ये सूज आणि जळजळ होऊ शकते. तसेच त्यांच्या हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. 6 / 9कोरोनाचा रुग्णांच्या मुत्रपिंड आणि यकृतावरही परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. मात्र या समस्या कायमस्वरूपी आहेत किंवा नाही, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 7 / 9कोरोनाच्या संक्रमणानंतर जे रुग्ण बराच काळ आयसीयूमध्ये राहिले असतील. त्यांना या आजारपणातून सावरल्यानंतर पोस्ट इंटेंसिव्ह केअर सिंड्रोम होऊ शकतो. त्यामुळे त्यांचे स्नायू कमकूवत होऊ शकतात. तसेच स्मृतीसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र अशी लक्षणे कुठल्याही गंभीर आजारानंतर दिसून येत असतात. 8 / 9कोरोनाच्या संसर्गादरम्यान तसेच नंतर रक्ताच्या गुठळ्या होण्यासारख्या समस्या दिसून येऊ शकतात. तसेच कमी गंभीर असलेल्या केसमध्ये रुग्णांना रक्त पातळ करण्यासाठी थिनर घेण्यासाठी सांगण्यात येऊ शकते. रक्तस्राव होण्याच्या धोक्यापासून वाचण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करण्याची गरज भासू शकते. 9 / 9कोरोनाचा विषाणू हा नवा विषाणू आहे. त्यामुळे याच्या दीर्घकालीन परिणामांबाबत शास्त्रज्ञांना अधिक माहिती नाही आहे. न्यूयॉर्कच्या फाइनस्टाइन इंस्टिट्युट फॉर मेडिकल रिसर्चच्या डॉक्टरांनी याबाबत सांगितले की, या आजारात दिसणारी बहुतांश लक्षणे नंतर दिसत नाहीत. मात्र ती कधी पर्यंत राहतात, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. काही रुग्णांमध्ये ही लक्षणे जाण्यासाठी इतरांपेक्षा अधिका काळ लागू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications