CoronaVirus alcohol relieving drug will help fight corona virus research reveals
दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 6:11 PM1 / 8दारूचे व्यसन सोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डायसल्फिराम या ऑषधाची कोरोनापासून सुटका होण्यास चांगली मदत होऊ शकते. असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. ही बाब एका संशोधनातून समोर आली आहे. (सर्व फोटो - प्रतिकात्मक)2 / 8या संशोधनात, रशियातील नॅशनल रिसर्च युनिव्हर्सिटी हायर स्कूल ऑफ इकोनॉमिक्सच्या (एचएसई) संशोधकांना दिसून आले, की संभाव्य उपचारासाठी, ज्यात वाढीदरम्यान परिवर्तनाची शक्यता कमी असेल, अशा कोरोना व्हायरसच्या संरचनात्मक घटकांची निवड करायला हवी. 3 / 8संशोधकांनी म्हटले आहे, की असे न केल्यास एका स्ट्रेन विरोधात जे औषध प्रभावी ठरेल, ते दुसऱ्यासाठी प्रभावी राहणार नाही. मेंदिलिव्ह कम्युनिकेशन्समध्ये छपून आलेल्या या अभ्यासानुसार, यासाठी सार्स- कोव-2 व्हायरसचे मुख्य प्रोटीन एम प्रो सर्वात प्रभावी प्रोटीन आहे.4 / 8संशोधकांनी सांगितले, की म्युटेशन विरोध करणारा होण्याबरोबरच एम प्रो कोरोना व्हायरसला रोखण्यातही मोठी भूमिका बजावतो. याचाच अर्थ, तो शरीरात व्हायरसला क्षीण करण्यास आणि रोखण्यास पूर्णपणे सक्षम आहे.5 / 8या संभाव्य औषधांना अमेरिकन खाद्य तथा ऑषध प्रशासनाकडून (एडीए) मंजुरी असलेल्या औषधाच्या डेटाबेसमधून घेण्यात आले आहे. संशोधकांनी सांगितले, की दारूचे व्यसन सोडण्यासाठी वापरले जाणारे डायसल्फिराम हे औषध सार्स कोव-2 सोबत दोन प्रकारे लढते.6 / 8संशोधकांनी सांगितले, की एक म्हणजे हे सह प्रतिबंधात्मक आहे आणि दुसरे म्हणजे हे कोरोनाच्या लक्षनांना रोखते. हे घटताच ग्लूटाथियोनला रोकण्यात मोठी मदद करते. जे एक अत्यंत महत्वाचे अँटीऑक्सीडंट आहे. 7 / 8जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या उपचारांसाठी सहा ओषधांना मंजुरी देण्यात आलेली आहे. वैज्ञानिक सातत्याने कोरोनाच्या लसीवर आणि औषधावर काम करत आहेत. तर जगभरात कोरोनाने लाखो लोकांचा बळी घेतला आहे.8 / 8जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या उपचारांसाठी सहा ओषधांना मंजुरी देण्यात आलेली आहे. वैज्ञानिक सातत्याने कोरोनाच्या लसीवर आणि औषधावर काम करत आहेत. तर जगभरात कोरोनाने लाखो लोकांचा बळी घेतला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications