coronavirus: Along with humans goats and fruits are also corona positive in this country BKP
coronavirus: अजबच! या देशात माणसांसोबत बकरी आणि फळेही कोरोना पॉझिटिव्ह By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 12:28 PM1 / 12कोरोना विषाणूचा संसर्ग आता जगातील बहुतांश देशांमध्ये झालेला आहे. दरम्यान, जगातील विविध भागात होत असलेल्या कोरोनाच्या प्रसारासोबत आता काही धक्कादायक बाबीही समोर येऊ लागल्या आहेत. 2 / 12यापूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग हा माणसांसोबतच वटवाघूळ, कुत्रे आणि मांजरांना झाल्याचे समोर आले होते. पण आता बोकडांनाही कोरोनाची बाधा होत असल्याची बाब समोर आली आहे.3 / 12एका आफ्रिकन देशात माणसांसोबतच बकरी आणि फाळांनाही कोरोना संसर्ग झाल्याचे कोरोना चाचण्यांमधून समोर आले आहे. या आफ्रिकन देशाचे नाव आहे. टंझानिया. 4 / 12टंझानियामध्ये कोरोनाची चाचणी करण्यासाठी माणसांसोबतच इतर प्राणी आणि फळांचे नमुने गोळा करण्यात आले होते. यामध्ये एक बकरी आणि पॉपॉ या स्थानिक फळाचे चाचणी नमुने पॉझिटिव्ह आले. 5 / 12दरम्यान, बकरी आणि फळांचे नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर टंझानियाचे राष्ट्रपती जॉन मागुफुली यांनी देशात मागवण्यात आलेल्या टेस्टिंग किट सदोष असल्याचे सांगत त्यांच्या तपासणीची मागणी केली आहे. 6 / 12आपल्या देशात कोरोनाच्या टेस्टिंग किट परदेशातून मागवण्यात आल्या आहेत. त्यात काही गडबड असू शकते. बकरी आणि पॉपॉ फळाला कोरोनाचा संसर्ग कसा काय होऊ शकतो. 7 / 12दरम्यान, देशातील कोरोना विषाणूची प्रकरणे लपवल्याप्रकरणी टंझानियेचे राष्ट्रपती मागुफुली यांच्यावर टीका झाली होती.8 / 12मागुफुली यांनी आपल्या लष्कराला टेस्टिंग किटची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. 9 / 12टंझानियामध्ये कोरोनाच्या चाचणीसाठी बकरी, पॉपॉ फळाचे नमुने घेण्याच आले होते. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असता बकरी आणि पॉपॉ फळाचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले10 / 12दरम्यान, या गोंधळामुळे टंझानियामध्ये अनेक लोक कोरोनाबाधित नसल्याचे समोर येत आहे. मात्र आपण याची पुन्हा चाचणी केली पाहिजे, असा दावा राष्ट्रपती मागुफुली यांनी केला आहे.11 / 12टंझानियामध्ये रविवारपर्यंत कोरोनाचे एकूणू ४८० रुग्ण सापडले होते. तर १७ जणांचा मृत्यू झाला होता. 12 / 12दरम्यान, कोरोनावरील उपचारांसाठी मदागास्कार येथून हर्बल औषधे आणण्यासाठी एक विशेष विमान पाठवत असल्याची घोषणा राष्ट्रपती मागुफुली यांनी केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications