शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus: लगेचच भारत सोडा! अमेरिकेच्या नागरिकांना सूचना, नव्या गाइडलाइन्स जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 5:24 PM

1 / 10
केवळ भारतात नाही, तर जगभरात कोरोनाचा कहर सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाचा प्रकोप सोसत आहेत. भारतात मात्र कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव असल्याचे दिसून येत आहे.
2 / 10
गेल्या सलग काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठत आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. यामुळे कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. (america advisory for india)
3 / 10
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने त्यांच्या नागरिकांसाठी नवीन सूचना जारी केल्या असून, शक्य तितक्या लवकर भारत सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
4 / 10
ब्लूमबर्गने यासंबंधी वृत्त दिले असून, अमेरिका सरकाने आपल्या नागरिकांनी कोरोनाच्या संकटात शक्य तितक्या लवकर भारत सोडण्यास सांगितले आहे. अमेरिकेकडून यासंबंधी अॅडव्हायजरी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
5 / 10
सुरक्षेच्या दृष्टीने हे योग्य असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. भारत आणि अमेरिका दरम्यान १४ विमाने सुरू आहेत. याशिवाय युरोपमधून जोडली जाणारी सेवा आहे.
6 / 10
ऑस्ट्रेलियाने यापूर्वी भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी आणली आहे. युकेनेही १० दिवसांच्या कालावधीत भारतात असणाऱ्या नागरिकांना देशात प्रवेश नाकारला आहे. भारतातून येणाऱ्या ब्रिटीश नागरिकांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन होणे अनिवार्य करण्यात आले आहे.
7 / 10
ऑक्सिजन, रेमडेसिविर अशा अनेक गोष्टींची भारताला कमतरता जाणवत असून अमेरिका, रशियासह अनेक देशांकडून मदत केली जात आहे.
8 / 10
भारतासह ब्रिटनसारखा देश कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडे कोरोना लसीचे अधिकचे डोस नाहीत, जे आपण या परिस्थितीत भारत किंवा अन्य देशांना देऊ शकू, असे स्पष्टीकरण ब्रिटनने दिले आहे.
9 / 10
आमच्याकडून भारताला ४९५ ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्स, १२० नॉन इनव्हेजिव्ह व्हेंटिलेटर्स, २० मॅन्युअल व्हेंटिलेटर्सचा पुरवठा केला जात आहे. मंगळवारी सकाळी ब्रिटनकडून ९५ ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्स, १०० व्हेंटिलेटर्सची पहिली खेप भारताला पोहोचली आहे, असे ब्रिटनने म्हटले आहे.
10 / 10
ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला आहे. ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर्ससहित अन्य वस्तूंच्या पुरवठ्यासाठी हा निधी खर्च केला जाईल. आतापर्यंत ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबियासारख्या देशांनी भारताकडे मदतीचा हात पुढे केला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAmericaअमेरिकाIndiaभारतJoe Bidenज्यो बायडनprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी