CoronaVirus American scientists identified antibody that may protect against coronavirus
मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 12:02 AM1 / 10कोरोनावरील अचूक उपचारासाठी जगभरात सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यातच आता वैज्ञानिकांना एक मोठे यश आले आहे. त्यांनी, मानवी शरीरात आढळणारी आणि कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी शोधून काढली आहे. 2 / 10अमेरिकेतील मॅसाचुसेट्स मेडिकल स्कूल युनिव्हर्सिटीच्या (University of Massachusetts Medical School, UMMS) संशोधकांनी कोरोना व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनला प्रतिकार करणारी मानवी मोनोक्लोनल अँटीबॉडी शोधून काढली आहे.3 / 10नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात म्हणण्यात आले आहे, की ही अँटीबॉडी श्वसन प्रणालीच्या आतील अंगांना घेरून असलेल्या पापुद्र्यावर एसीई2 रिसेप्टरवर व्हायरसला थांबू देत नाही. 4 / 10संशोधकांनी 16 वर्षांपूर्वी, याच प्रकारचा व्हायरस आणि सार्सविरोधात प्रभावी होती, अशी आयजीजी मोनोक्लोनल अँटीबाडी शोधली होती. यानंतर संशोधकांनी जुना सार्स कार्यक्रम पुन्हा जिवंत करण्याची प्रक्रिया सुरू केली. 5 / 10यानंतर संशोधकांनी 16 वर्षांपूर्वी विकसित करण्यात आलेल्या गोठलेल्या पेशी मिळवून त्यांना वितळवणे सुरू केले. यानंतर, एका प्रकारच्या कोरोना व्हायरसमध्ये, जे कामी आले, तेच दुसऱ्या व्हायरससाठीही उपयुक्त ठरते, का? हे निश्चित करणे सुरू झाले.6 / 10वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की दोन्ही कोरोना व्हायरसमध्ये 90 टक्के साधर्म्य असले तरी, मोनोक्लोनल अँटीबॉडीने सध्याच्या कोरोना व्हायरसशी संबंध प्रस्थापित करण्याची कुठलीही क्षमता प्रदर्शित केलेली नाही.7 / 10मोनोक्लोनल अंटीबॉडी, एक अशी अँटीबॉडी आहे, जी समान इम्यून सेल तयार करते. या सर्व पेशी एका विशिष्ट प्रकारच्या मुळ पेशींच्या क्लोन असतात. 8 / 10दुसरीकडे डब्ल्यूएचओने म्हटले आहे, की जागतीक महामारी असलेल्या कोरोनाची लस प्रामाणिकपणे सर्वांपर्यंत पोहोचवणे मोठे आव्हान आहे. 9 / 10डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे, की कमी संख्येने असलेल्या या लशींवर विकसित देशांनीच कब्जा करू नये, यावरही लक्ष ठेवावे लागेल.10 / 10डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे, की कमी संख्येने असलेल्या या लशींवर विकसित देशांनीच कब्जा करू नये, यावरही लक्ष ठेवावे लागेल. आणखी वाचा Subscribe to Notifications