coronavirus bangladeshi doctors found effective drug combination vrd
CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 7:58 AM1 / 14कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढत असून, या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. 2 / 14तसेच बरेच देश या जीवघेण्या व्हायरसवर लस तयार करण्यासाठी मेहनत घेत आहेत. सध्या तरी सोशल डिस्टन्सिंग आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणं हेच उपाय कोरोनाला थोपवण्यासाठी वापरले जात आहेत. 3 / 14तर काही देशांमध्ये अँटी व्हायरल व अन्य औषधांचा वापर करून कोरोनाबाधितांवर उपचार सुरू केलेले आहेत. 4 / 14बांगलादेशात दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. बांगलादेशमध्ये डॉक्टरांनी केलेल्या उपचाराला चांगले यश मिळाले आहे. 5 / 14बांगलादेश मेडिकल कॉलेज रुग्णालयाचे प्रमुख डॉ. तारेख आलम यांना हे यश मिळालेलं आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे रुग्ण आता ठणठणीत झाले आहेत. 6 / 14डॉ. आलम यांनी दोन औषधांनी ६० कोरोनाग्रस्तांवर उपचार केले. चार दिवस उपचार घेतल्यानंतर हे कोरोनाबाधित रुग्ण पूर्णतः ठीक झाले आहेत. 7 / 14डॉ. तारेख आलम यांनी या रुग्णांवरील उपचारात दोन औषधांच्या मिश्रणाचा वापर केला. 8 / 14डोव्हिसिक्लिन (Doxycycline) या अँटीबायोटिकच्या एका डोसमध्ये इव्हर्मेक्टिन (Ivermectin ) नावाचे अँटीप्रोटोझोल औषधाचे मिश्रण करत डॉक्टरांनी उपचार केले आणि त्याला यशही मिळालं. 9 / 14या रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम पाहायला मिळालेले नाहीत. प्रयोग केलेले सर्व रुग्ण निरोगी झाले आहेत. 10 / 14कोरोनाबाधितांवरील या औषधांच्या वापराबाबत आशादायी चित्र निर्माण झाल्याचं डॉ. आलम यांनी सांगितलं आहे. 11 / 14तसेच ते लवकरच आंतरराष्ट्रीय नियतकालिकेच्या माध्यमातून या उपचारासंबंधीची माहिती देणार असल्याचेही सांगितले जात आहे. 12 / 14चीन आणि हॉंगकॉंगनं औषधांचे मिश्रण वापरून कोरोनाबाधितांना ठीक करण्याचा प्रयत्न केला होता.13 / 14आता बांगलादेशमध्येही डॉक्टरांनी असा प्रयोग केला असून, त्याला चांगलं यश मिळालं आहे. बांगलादेशी डॉक्टरांनी काही औषधांचे मिश्रण वापरून चार दिवसात कोरोना रुग्ण निरोगी केला.14 / 14बांगलादेशमध्ये २१ हजार जण कोरोना संक्रमित असून, ३१४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications