शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus : ते काय करीत आहेत, याची त्यांना कल्पना नाही, ओबामांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 1:05 PM

1 / 12
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोरोना विषाणूविरुद्ध ज्या पद्धतीनं लढा देत आहेत, त्यावर जगभरातून टीका होत आहे.
2 / 12
विशेष म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पुन्हा ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
3 / 12
ओबामा यांनी केवळ ट्रम्प यांच्यावर कडक टीका केली नाही, तर ते काय करीत आहेत, याची काही कल्पना नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
4 / 12
'द गार्डियन' च्या वृत्तानुसार, महाविद्यालये आणि विद्यापीठांत शिकणा-या विद्यार्थ्यांच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना ओबामांनी ट्रम्प यांना इशारा दिला आहे.
5 / 12
ओबामा म्हणाले की, ट्रम्प प्रशासनातील अनेक अधिकारी या महामारीची जबाबदारी स्वीकारत असल्याचं दिसत नाहीत.
6 / 12
विद्यार्थ्यांना उद्देशून ओबामा म्हणाले की, या साथीचे पडसाद पूर्ण जगभर उमटत आहेत. पण जबाबदार पदांवरील बर्‍याच लोकांना ते काय करीत आहेत हे अद्याप माहीत नाही. त्यापैकी बरेच जण जबाबदारी घेण्याचं फक्त ढोंग करत आहेत.
7 / 12
ओबामा यांनी जॉर्जियात मारल्या गेलेल्या लोकांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले आहेत की, पांढरपेशा लोकांच्या तुलनेत गौरवर्णीयांच्या समुदायावर कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात होणारा परिणाम अमेरिकन व्यवस्थेच्या उणिवा उघडकीस आणत आहे.
8 / 12
माजी राष्ट्राध्यक्षांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. त्यांनी फेब्रुवारीमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा उल्लेख केला, ज्यात जॉर्जियातील रस्त्यावर जॉगिंग करत असताना 25 वर्षीय अहमद अरबेरी ठार करण्यात आले होते.
9 / 12
आपल्या संपूर्ण भाषणात ओबामा यांनी डोनाल्ड ट्रम्प किंवा त्यांच्या कोणत्याही अधिका-यांचे नाव घेतले नाही, परंतु त्यांच्यावर जोरदार टीका केली. 2017मध्ये व्हाइट हाऊस सोडल्यानंतर बराक ओबामा सामान्यत: शांत होते. पण गेल्या दिवसांपासून ते सातत्यानं ट्रम्प प्रशासनावर हल्लाबोल करत आहेत. ते डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे दावेदार जो बिडेन यांचीही बाजू घेत असल्याचं चित्र समोर आलं आहे.
10 / 12
काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांचा वेब कॉल लीक झाल्यावर त्यांनी ट्रम्प यांच्यावरही टीका केली होती. ओबामा त्यांच्या प्रशासनाच्या काही माजी सहकार्‍यांना वेब कॉलद्वारे संबोधित करीत होते. ते म्हणाले की, आम्ही फक्त एका व्यक्तीवर किंवा राजकीय पक्षाविरुद्ध लढत नाही. आपण स्वार्थी, इतरांना शत्रू म्हणून पाहणारी, विभाजन करणारी आणि अराजक माजवणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध लढत आहोत.
11 / 12
त्या आवाहनात ओबामांनी असेही म्हटले की, जागतिक महामारीविरुद्ध आमचा प्रतिसाद हताश आणि थंड आहे. या मानसिकतेमुळे ती एक अतिशय गोंधळलेली आपत्ती ठरली आहे. आगामी निवडणुकीत जो बिडेन यांच्यासाठी प्रचार देखील करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
12 / 12
बराक ओबामा यांचा हा वेब कॉल याहू न्यूजकडून प्राप्त झाला. यात ओबामा यांनी आपल्या माजी सहकाऱ्यांशी बर्‍याच मुद्द्यांवर खुलेपणाने चर्चा केली होती. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये अध्यक्षीय निवडणुका होणार आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डो बिल्डन यांच्यासमवेत डेमोक्रॅटिक पक्षाकडून जो बिडेन यांच्या उमेदवारीचा निर्णय घेण्यात आला आहे. आता बराक ओबामा यांनीही बिडेन यांना उघडपणे समर्थन देण्याची घोषणा केली आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प