शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : कोरोनापुढे 'हा' देश हतबल! आकडेवारी जाहीर न करण्याचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 5:06 PM

1 / 12
जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
2 / 12
कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत.
3 / 12
अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
4 / 12
कोरोनामुळे आतापर्यंत 406,549 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 7,113,012 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.
5 / 12
कोरोनापुढे ब्राझीलही हतबल झाला आहे. कोरोना संदर्भातील आकडेवारी जाहीर न करण्याचा निर्णय या देशाने घेतला आहे. ब्राझीलमध्ये मृतांची संख्या वाढत आहे.
6 / 12
सरकारी संकेतस्थळावरून एकूण करोनाबाधित आणि मृतांची संख्या यांची आकडेवारी काढण्याचे आदेश ब्राझीलच्या सरकारने दिले आहेत.
7 / 12
कोरोनाग्रस्तांची संख्या आणि मृत्यू यांची संख्या जाहीर न करण्याचा निर्णय घेतल्याने ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे.
8 / 12
फक्त गेल्या 24 तासांची माहिती देण्यात येणार आहे. राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांच्या या निर्णयाचा स्थानिक माध्यमांनी आणि संसदेतील काही लोकांनी विरोध केला आहे.
9 / 12
ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सलग चार दिवस एक हजारांहून अधिक जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
10 / 12
जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही 70 लाखांच्या वर गेली आहे. जगामध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या संख्येत ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे.
11 / 12
ब्राझीलमध्ये अमेरिका आणि ब्रिटननंतर सर्वाधिक मृतांच्या संख्येची नोंद करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
12 / 12
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBrazilब्राझीलDeathमृत्यू