शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : दयावान! कोरोनाशी लढण्यासाठी 'या' व्यक्तीने दिलं जगातलं सर्वात मोठं दान, किती ते वाचून व्हाल थक्क....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 11:47 AM

1 / 10
कोरोना व्हायरससोबत लढा देण्यासाठी जगभरातील लोक मदत करत आहेत. भारतासहीत जगभरातील श्रीमंत लोकांनी मोठमोठी रक्कम सरकारला दान केली आहे. या यादीत आता ट्विटरचे चीफ एक्झिक्युटिव्ह जॅक डोर्सी यांचा समावेश झाला आहे.
2 / 10
जगभरातील लोक कोरोनाला मात देण्यासाठी जमेल तशी मदत करत आहेत. डोर्जी दान केलेली रक्कम ही व्यक्तिगत दानातील सर्वात मोठी रक्कम आहे.
3 / 10
जॅक डोर्सी यांनी कोरोनावर रिसर्च करण्यासाठी आणि त्याला मात देण्यासाठी तब्बल 1 बिलियन डॉलर (7630 कोटी रूपये)ची मदत करण्याची घोषणा केली आहे.
4 / 10
डोर्सी यांनी 2006 मध्ये ट्विटरची स्थापना केली होती. ते या कंपनीने को-फांउडर आहेत. त्यांनी मंगळवारी ट्विट करून ही माहिती दिली की, ही रक्कम स्माल स्टार्ट नावाच्या चॅरिटेबल फंडमध्ये दिली आहे. याचा उपयोग कोरोना मात देण्यासाठी केला जाईल.
5 / 10
43 वर्षीय डोर्जी यांनी माहिती दिली आहे की, त्यांनी दान केलेली ही रक्कम त्यांच्या एकूण संपत्तीतील 28 टक्के इतकी आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार डोर्सी यांच्याकडे 3.9 बिलियन डॉलरची एकूण संपत्ती आहे.
6 / 10
याआधी अॅमेझॉनचे फाउंडर बेजॉस म्हणाले होते की, ते अमेरिकेतील फूड बॅंक चॅरिटीला 100 मिलियन डॉलर दान करतील. हे सध्या जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
7 / 10
बेजोस म्हणाले होते की, सामान्य वेळीही अमेरिकेतील घरांमध्ये फूड इनसिक्योरिटी एक मोठा मुद्दा असतो. कोविड-19 सारख्या महामारीने ही समस्या अधिक वाढवली आहे.
8 / 10
बेजोस यांची एकूण संपत्ती ही 123 बिलियन डॉलर इतकी आहे आणि त्यांनी दान केलेली रक्कम ही त्यांच्या एकूण संपत्तीच्या 0.1 टक्का इतकी आहे.
9 / 10
वैश्विक आकडेवारीबाबत सांगायचं तर आतारपर्यंत कोरोना विरोधातील लढ्यासाठी साधारण 9 लाख कोटी रूपये दान करण्यात आल्याची माहिती आहे.
10 / 10
बिल गेट्स यांनीही त्यांच्या कोरोनावरील लसीच्या निर्मीतीसाठी 100 मिलियन डॉलर दान केले. तर डेल कंपनीने मालक मायकल डेल यांनीही 100 मिलियन डॉलर दान केले.