शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: रशियापाठोपाठ चीनची बाजी; कोरोनावरील लस लवकरच बाजारात येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 2:28 PM

1 / 10
कोरोना संकटामुळे संपूर्ण जगात खलनायक ठरलेला चीन आता कोरोनावरील लसीच्या संशोधन आणि उत्पादनात बाजी मारताना दिसत आहे. रशियापाठोपाठ आता चीननं कोरोना लसीच्या उत्पादनाला परवानगी दिली आहे.
2 / 10
रशियानं स्पुटनिक व्ही लसीचं पहिल्या बॅचमधील उत्पादन केलं. तर चीनच्या CanSino Biologics कंपनीच्या Ad5-nCOV लसीच्या उत्पादनाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
3 / 10
रशियापाठोपाठ चीननं कोरोनावरील लस शोधली आहे. मात्र या दोन्ही लसींना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली नाही. पण रशिया, चीननं अंतर्गत वापरासाठी लसींच्या उत्पादनाला मंजुरी दिली आहे.
4 / 10
CanSino Biologics कंपनीनं Ad5-nCOV लसीच्या स्वामित्व हक्कांसाठी अर्ज केला. तो सरकारनं मंजूर केला आहे. CanSino Biologics लस निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी आहे. स्वामित्व हक्क मिळवणारी ती चीनमधील पहिलीच कंपनी आहे.
5 / 10
CanSino Biologics नं तयार केलेली लस सर्दी-तापावरील लसीची पुढील आवृत्ती आहे. यामध्ये कोरोना विषाणूच्या जेनेटिक मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ-अस्त्राजेनेकाच्या लसीमध्येही याच पद्धतीचा वापर केला गेला आहे.
6 / 10
रशियानं कोरोनावरील स्पुटनिक व्ही लसीचं पहिल्या टप्प्यातलं उत्पादन पूर्ण केलं आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेरपर्यंत लस वापरासाठी उपलब्ध होईल.
7 / 10
रशियन लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केला आहे. त्यांच्या मुलीलादेखील ही लस टोचण्यात आली आहे.
8 / 10
रशियन लसीचं भारतात उत्पादन करण्यासाठी अनेक कंपन्यांसोबत बातचीत सुरू आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड अनेक भारतीय औषध कंपन्यांसोबत बातचीत करत आहे.
9 / 10
रशियानं पाच देशांमध्ये प्रत्येक वर्षी ५०० मिलियन डोस तयार करण्याची योजना आखली आहे. भारतासोबतच कोरिया आणि ब्राझील यांच्यासोबतही संवाद सुरू आहे.
10 / 10
जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र कोरोनावरील लस येण्यास अजून काही महिन्यांचा अवधी लागेल, असं म्हटलं आहे. सर्वसाधारणपणे लस तयार करण्यास ५ ते १० वर्षांचा कालावधी लागतो. पण सध्याचं संकट पाहता लस येण्यास किमान दीड वर्ष लागतील, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या